‘कोरोनाविरुद्ध लढण्याचे ठोस धोरण नाही’ | पुढारी

'कोरोनाविरुद्ध लढण्याचे ठोस धोरण नाही'

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन 

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोना महामारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. कोरेाना म्युटेशनची माहिती मिळविण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीचा वापर करा, अशी विनंती त्यांनी पत्रातून केली आहे. तसेच लसीकरणाबाबत आणि कोरोनाविरुद्ध लढण्यास केंद्र सरकारचे कोणतेही ठोस धोरण नाही,अशी टीका गांधी यांनी पत्रातून केली आहे.

वाचा : ‘पंतप्रधानांनी काम की बात केली असती तर बरे झाले असते’: ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केले ट्विट

‘केंद्र सरकारच्या अपयशामुळे देश पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तराच्या लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या वर्षीसारखे गरिबांना कठीण प्रसंगाचा सामाना करावा लागू नये, यासाठी तत्काळ आर्थिक मदत पोहचवण्यात यावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे पत्र पोस्ट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे, ‘पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आलीय कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात अडकला आहे. अशा अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपले सर्वात जास्त प्राधान्य असायला हवे. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे. जगातील प्रत्येक सहा लोकांमध्ये एक व्यक्ती भारतीय आहे. आकार, भारतातील अनुवांशिक विविधता आणि गुंतागुंतीमुळे भारतात विषाणूला आपलं स्वरूप बदलण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. परिणामी हा विषाणू अधिक धोकादायक होण्यास अनुकुलता आहे.  हे या महामारीतून धडधडीतपणे समोर आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता करोना विषाणूची दुसरी, तिसरी लाट येऊ शकते. या विषाणूची अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकते,’ असे गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा : कोरोनाचे संकट गंभीर तरीही सिरो सर्व्हेला विश्रांती

‘हा विषाणू आणि त्याच्या म्युटेशन्सचा वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास व्हायला हवा. विषाणूच्या म्युटेशनविरुद्ध लसींच्या प्रभावाचे  मूल्यांकन केले जावे. सर्व जनतेचे त्वरित लसीकरण केले पाहिजे, अशी मागणी करताना  केंद्र सरकारकडे कोविड विरुद्ध लढण्यासाठी किंवा लसीकरण मोहीम राबवण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही स्पष्ट रणनीती नाही. महामारीवर विजय मिळवण्याची घोषणा केंद्र सरकारकडून केली जात होती तेव्हा कोरोना जास्त फैलावत होता, अशी टीकाही त्यांनी पत्रात केली आहे. 

वाचा : लसीकरणात भारत जगात तिसर्‍या स्थानी

Back to top button