Whatsapp ने दिली सर्वांत मोठी बातमी! | पुढारी

Whatsapp ने दिली सर्वांत मोठी बातमी!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

व्हॉट्सअॅपने आपल्या वादग्रस्त खासगी धोरणाच्या  (Whatsapp New Privacy Policy) बाबतीत अखेर युझर्ससमोर झुकावे लागले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने युझर्सने खासगी धोरण अपडेट संदर्भातील अटी मान्य न केल्यास तर त्याचे खाते डिलीट किंवा इनॲक्टिव्ह केलं जाणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी धोरण स्वीकारण्यासाठी व्हॉट्सअॅपने १५ मेची मुदतही काढून टाकली आहे. फेसबुकच्या मालकीच्या असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की अटी मान्य केल्या गेल्या नाही तरी काही होणार नाही. 

व्हॉट्सअ‍ॅपच्या खासगी धोरणावर युजर्सनी त्यांच्या डेटाची गोपनीयता आणि हक्क याबद्दल चिंता व्यक्त केली होती. व्हॉट्सअॅपच्या युझर्सनी सांगितले की, नवीन धोरणांतर्गत त्यांचा डेटा व्हॉट्सअ‍ॅपची मालकी कंपनी फेसबुकशी शेअर केला जाईल. त्यामुळे व्हॉट्स अॅपवर बरीच टीका झाली. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने शुक्रवारी सांगितले की १५ मे रोजी कोणतेही खाते हटवले जाणार नाही किंवा धोरणाशी संबंधित अपडेट न केल्यास अकाऊंट डिलीट होणार नाही. 

ईमेलद्वारे पाठविलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, या अपडेटमुळे १५ मे रोजी कोणतेही खाते हटवले जाणार नाही. भारतात कोणतीही व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद केली जाणार नाही. आम्ही येत्या काही आठवड्यांत लोकांना नवीन माहिती पाठवू. प्रवक्त्याने सांगितले की नवीन सेवा अटींचे अपडेट प्राप्त झालेल्या बहुतेक युझर्सनी हे स्वीकारले आहे, परंतु काही लोकांना अद्याप हे अपडेट प्राप्त झालेलं नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या खासगी धोरणाची बाब न्यायालयात पोहोचली होती. त्याचबरोबर केंद्र सरकारनेही हा विषय वरच्या स्तरावर उपस्थित केला होता.

Back to top button