रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना रिपोर्टचे नियम बदलले! काय आहे नवीन नियमावली? | पुढारी

रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना रिपोर्टचे नियम बदलले! काय आहे नवीन नियमावली?

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कोरोनाच्या रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत राष्ट्रीय धोरणांमध्ये बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेशासाठी कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट अनिवार्य होता. यापुढे नवीन बदलांच्या अंतर्गत अहवालाची आवश्यकता राहणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना निर्देश दिले आहेत. 

अधिक वाचा : ‘देशातील १८० जिल्ह्यात आठवडाभरापासून कोरोनाचा एकही रूग्ण नाही’

नव्या पॉलिसीनुसार ३ दिवसात नवीन धोरण लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या धोरणांतर्गत संशयित रूग्णांना संशयित प्रभागांमध्ये प्रवेश मिळू शकेल. यामध्ये कोविड केअर सेंटर, पूर्णपणे समर्पित कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल यांचा समावेश आहे. तसेच नवीन धोरणात हे स्पष्ट केले आहे की रूग्ण कोणत्या राज्यात आहेत त्या आधारावर त्यांना नाकारता येणार नाही. कोणत्याही पेशंटला कोठेही प्रवेश दिला जाऊ शकतो.

अधिक वाचा : राज्यांना आतापर्यंत देण्यात आले १७.४९ कोटी मोफत डोसेस

ऑर्डरनुसार, कोविड अहवाल पॉझिटिव्ह असणे आवश्यक नाही, लक्षणे असलेले रुग्णही रुग्णालयात ठेवले जाऊ शकतात. या बदलामुळे उपचारासाठी भटकणार्‍या रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरं तर, कोविडच्या निगेटिव्ह अहवालामुळे अनेक रुग्णालये रूग्णालयात दाखल करण्यास नकार देतात, तर काही रुग्णांना प्रवेश मिळत नाही कारण त्यांचे रुग्ण कोविडची लक्षणे दाखवत आहेत.

अधिक वाचा : लॉकडाऊनमध्ये कारनामा; शेतातून काढली वरात

Back to top button