'मोदी सरकारने ओंजळभर पाण्यात जीव द्यायला हवा' | पुढारी

'मोदी सरकारने ओंजळभर पाण्यात जीव द्यायला हवा'

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दिल्ली पोलिसांनी युवक काँग्रेसचे प्रमुख बी. व्ही. श्रीनिवास यांची आज (दि. १४) चौकशी केली. श्रीनिवास यांनी सांगितले की पोलिस आज (ता.१४) युवक काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचली होती. त्यांना जाणून घ्यायचे होते की आम्ही कोरोना काळात मदत कशी करत आहोत. आम्ही त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. 

श्रीनिवास पुढे म्हणाले की, ‘दिल्ली पोलिसांना आम्ही मदत कार्याच्या नावाखाली ऑक्सिजन, औषधांचा काळा बाजार तर करत नाही ना हे तपासायचे होते. त्यांना आमच्या ऑक्सिजन सिलेंडर आणि औषधांचा पुरवठ्याचे स्त्रोत जाणून घ्यायचे होते.’ दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिस जे लोक कोरोना काळात मदत करत आहेत त्यांची चौकशी करत आहेत.

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करुन तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी ‘मोदी सरकार अजून किती खालच्या पातळीवर जाणार? यापेक्षा घाणेरडे, बालिश, निर्लज्ज काम अजून काय असू शकते?’ असे ट्विट केले. 

ते पुढे म्हणाले की, ‘कोरोनाच्या संकट काळात देवदूतासारखे मदत करणारे श्रीनिवास आणि त्यांच्या युवा साथीदाराविरुद्ध पोलिस कारवाई करण्याचे घाणेरडे काम मोदी सरकारने केले. त्यांचा हा भयानक चेहरा आहे. मोदी सरकारने  ओंजळभर पाण्यात जीव द्यायला हवा. तुम्ही जरी आमच्या हातात बेड्या ठोकल्या तरी काँग्रेस आणि युवक काँग्रेस कोरोनाग्रस्त लोकांची मदत करणे थांबवणार नाहीत.’

Back to top button