देशात कोरोना रुग्णवाढीला किंचित ब्रेक, पण मृत्यूचे थैमान काही थांबेना! | पुढारी

देशात कोरोना रुग्णवाढीला किंचित ब्रेक, पण मृत्यूचे थैमान काही थांबेना!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशातील कोरोनाची दुसरी लाटेने हाहाकार माजवला असतानाच गेल्या २४ तासांत कोरोनाबाधितांची संख्या काहीशी कमी झाली आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ लाख २६ हजार ०९८ रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच दिवसांत चौथ्यांदा असे घडताना दिसत आहे की, नवीन बाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत बरीच वाढ झालेली आहे. अशातच गेल्या २१ तासात ३ लाख ५३ हजार २९९ लोकांनी कोरोनावर मात केली आहे. याच दरम्यान देशाची चिंता कमी करणारी बातमी आली आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही ४००० वरून खाली आला असून गेल्या २४ तासात कोरोनामुळे ३८९० जणांचा मृत्यू झाला. यासह कोरोनावर मात केलेल्या लोकांची संख्याही दोन कोटींच्या पुढे गेली आहे.

अधिक वाचा : आंध्र सीएम जगनमोहन रेड्डींचा जामीन रद्द करा म्हणणाऱ्या खासदाराला अटक!

आतापर्यंत भारतात २,४३,७२,९०७ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तथापि, यापैकी २,०४,३२,८९८ लोकांनी या प्राणघातक कोरोनाचा पराभव केला असून  देशात सक्रिय रूग्णांची संख्या ३६ लाख ७३ हजार ८०२ आहे. त्याचवेळी, कोरोनाने आतापर्यंत २ लाख ६६ हजार २०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाविरोधातील या लढाईत संसर्ग रोखण्यासाठी देशभर लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत १८,०४,५७,५७९ लोकांना लस देण्यात आली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये कोरोनाचा संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत असून काही प्रमाणात परिस्थितीत सुधारणा दिसून येत आहे. 

अधिक वाचा : ऑक्सिजनवरही ‘लव्ह यू जिंदगी’ म्हणणार्‍या तरुणीला मृत्यूने गाठले!

देशात कोरोनाची दुसरी लाटेचा उद्रेक सुरू असून ट्रेसिंगवर भर देण्यात येत आहे. जेणेकरून लवकरात लवकर संक्रमीत लोकांना ओळखता येऊ शकेल. तसेच कोरोना चाचण्यांतही वाढ करण्यात आली आहे. आतापर्यंत देशात ३१,३०,१७,१९३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. तर गेल्या २४ तासांत तब्बल १६,९३,०९३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

Back to top button