राज्यांकडे केवळ २ कोटी डोस शिल्लक!  | पुढारी

राज्यांकडे केवळ २ कोटी डोस शिल्लक! 

नवी दिल्ली :  पुढारी वृत्तसेवा

कोरोना महारोगराईचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लसींचे २० कोटी ७६ लाख १० हजार २३० डोस नि:शुल्क पुरवण्यात आले आहेत. यातील वाया गेलेल्या डोससह १८ कोटी ७१ लाख १३ हजार ७०५ डोसचा वापर करण्यात आल्याची माहिती सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात

आली आहे. केवळ २ कोटी ४ लाख ९६ हजार ५२५ डोस राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध आहेत. या डोस शिवाय २ लाख ९४ हजार ६६० डोस वितरित करण्याचे काम सुरु असून येत्या ३ दिवसांमध्ये ते राज्यांना मिळतील, असेही मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अधिक वाचा : रत्नागिरी जिल्ह्याला ताउक्ते चक्रीवादळाने झोडपले; शासकीय रुग्णालयातही पाणी तुंबले

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात लशींचे २२ लाख ७० हजार २१६ डोस शिल्लक आहेत. उत्तर प्रदेशा पाठोपाठ तामिळनाडू  १४,१९,२९६, मध्यप्रदेश १३,७३,७८३, गुजरात ११,२५,५४७, आंध्र प्रदेश ११,२१,३६९, छत्तीसगढ ९,९६,९८६, प.बंगाल ९,१७,०४४, झारखंड ८,८९, २१२, ओडिशा ७,९२,५६१ तसेच कर्नाटकमध्ये ७ लाख ६ हजार ७३१ डोस शिल्लक आहेत. 

अधिक वाचा : ताउक्ते चक्रीवादळाने उडविली रायगडकरांची झोप; घरांचे नुकसान, वीजपुरवठा खंडित 

कोरोना विरोधातील लसीकरणाच्या व्यापक आणि वेगवान तिसऱ्या टप्याची १ मे  पासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. या धोरणा अंतर्गत एकूण उत्पादित लसींपैकी केंद्रीय औषध प्राधिकरणाने मान्यता दिलेल्या (सीडीएल)  लसींच्या डोजपैकी ५०% डोस प्रत्येक महिन्यात सरकारकडून खरेदी केल्या जातील. केंद्र सरकार पूर्वीप्रमाणे हे डोस पूर्णपणे विनामूल्य राज्य सरकारांना उपलब्ध करुन देत राहील, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

अधिक वाचा : निखळ हास्य आणि मुक्त अभिनय करणारी ‘मुक्ता’

 लसींच्या डोसचे वाटप आणि वापर 

 राज्य          डोसचे वाटप     डोजचा वापर

१) महाराष्ट्र       २,०१,५४,९३०    १,९७,३३,३१४

२) उ.प्रदेश      १,७४,५०,०१०    १,५१,७९,७९४

३) गुजरात       १,६२,०४,७३०   १,५०,७९,१८३

४) राजस्थान    १,६०,८९,८२०    १,५९,५०,३७२

५) प.बंगाल     १,३४,८३,६४०   १,२५,६६,५९६

६) कर्नाटक     १,१८,९७,४४०   १,११,९१,७०९

७) म.प्रदेश      १,०७,५१,०१०   ९३,७७,२२७

८) बिहार           ९८,०३,२७०    ९३,४८,७७२

९) केरळ          ८८,६९,४४०     ८४,१५,४५७

१०) तामिळनाडू  ८६,५५,०१०    ७२,३५,७१४

Back to top button