भाजप आमदारालाच ‘देशद्रोहा’चा गुन्हा दाखल होण्याची भीती | पुढारी

भाजप आमदारालाच 'देशद्रोहा'चा गुन्हा दाखल होण्याची भीती

लखनौ; पुढारी ऑनालईन : उत्तर प्रदेशमधील भाजपचे सीतापूरचे आमदार राकेश राठोड यांनी स्वतःच्याच सरकारवर टीका केली. त्यांनी माध्यमांमध्ये जास्त बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल असे वक्तव्य केले. 

आमदार राकेश राठोड म्हणाले, ‘मी अनेक पावले उचलली पण, लोकप्रतिनिधींची लायकीच काय आहे? जर मी जास्त बोललो तर माझ्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल होईल.’ त्यांनी सीतापूर येथील सरकारी ट्रॉमा सेंटर कार्यान्वित करण्याबाबत काय प्रयत्न सुरु आहेत असे विचारल्यानंतर हे वक्तव्य केले. 

नाहीतर मलाही अटक करा : ममता बनर्जी

त्यानंतर राकेश राठोड यांना तुमच्याच सरकारमध्ये आमदार म्हणून तुमच्या भागाचे प्रतिनिधीत्व करु शकत नाही असे आपल्याला म्हणायचे आहे का? असे विचारण्यात आल्यानंतर त्यांनी ‘तुम्हाला वाटते का की आमदार आपले मत मांडू शकतात? तुम्हाला माहीत आहे की मी याआधीही या विषयावर आवाज उठवला होता.’ अशी प्रतिक्रिया दिली. 

राठोड हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. त्यांनी २०१७ च्या निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ते काही काळ बहुजन समाज पक्षाशी जोडले गेले होते. गेल्या वर्षी राज्यातील भाजप नेतृत्वाने त्यांची कथित पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारी अॅडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण मागवले होते. या क्लीपमध्ये राठोड दुसऱ्या भाजप आमदाराशी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी लोकांना कोरोनाच्या महामारीत घंटा आणि थाळ्या वाजवण्यास सांगणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत होते.

‘पीएम आणि पीएम केअरमधील व्हेंटिलेटर एकसारखेच’

आमदार राठोड म्हणाले होते की, ‘तुम्ही टाळ्या वाजवून कोरोना घालवणार आहात का? तुम्ही वेडेपणाचे रेकॉर्ड मोडत आहात. शंख वाजवल्याने कोरोना जाणार आहे का? तुमच्यासारखे लोक वेडे आहेत. ते तुमचा नोकरी धंदा काढून घेतील.’

Back to top button