पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दणका सुरुच! | पुढारी

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दणका सुरुच!

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन ; एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलच्या दरात २५ पैसे आणि डिझेलवर ३० पैशांची वाढ करण्यात आले आहे. पेट्रोल प्रतिलिटर १००.१९ रुपये आणि डिझेल ९२.१७ रुपये दराने विक्री होत आहे. दिल्लीत पेट्रोल ९३.९४ तर डिझेल ८४.८९ प्रतिलिटर विक्री होत आहे.

अधिक वाचा : कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसर्‍या लाटेचा सामना सक्षमपणे

सतत होणाऱ्या पेट्रोल दरवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज (शनिवार) पुन्हा एका दिवसाच्या विश्रांतीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यापासून मे महिन्यात १६ दिवस इंधनाच्या किंमती वाढविण्यात आल्या आहेत. दरम्यान मागच्या १६ दिवसांत एकही दिवस पेट्रोल आणि डिझेल दरात एकदाही कपात झाली नाही. 

अधिक वाचा : मुंबई : कल्‍याण-शिळ मार्गावरील काटई गावाजवळ एमआयडीसीची जलवाहिनी फुटली  

पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने मागच्या महिन्यात किरकोळ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली होती. पेट्रोल ७७ पैसे आणि डिझेल ७४ पैसे स्वस्त झाले होते. पण ४ मेनंतर पुन्हा किंमती वाढण्यास सुरवात झाली आणि मे महिन्यात पेट्रोल ३.५९ रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर या महिन्यात डिझेलमध्ये प्रतिलिटर ४.१३ रुपयांची वाढ झाली आहे. देशातील अनेक शहरांत पेट्रोल १०० रुपयांच्या पलीकडे विकले जात आहे.

Back to top button