लस वितरणाचे कॅग ऑडिट करा : पी. चिदंबरम | पुढारी

लस वितरणाचे कॅग ऑडिट करा : पी. चिदंबरम

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : कोरोना लस वितरणाचे कॅग ऑडिट झाले पाहिजे, अशी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते पी. चिदंबरम यांनी मागणी केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरु लागली आहे. पण, कोरोना प्रतिबंधक लस वितरणाबाबत चिंता कायम आहे. नुकतेच भारत बायोटेकने कोरोना लसीचा पुरवठा आणि उत्पादन प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळेच कोरोना लसीचा तुटवडा जाणवत आहे असल्याचे वक्तव्य केले होते.

सुशील कुमारमुळे नवज्योतसिंग सिद्धू का चर्चेत?

दरम्यान, पी चिदंबरम यांनी ट्विट करुन म्‍हटले आहे की, हरवलेल्या लसीचे रहस्य दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. कोरोना लसींच्या एका बॅचचे उत्पादक करण्यासाठी लागणाऱ्या वेळेबाबत भारत बायोटेकने केलेले विधान हे सभ्रंम निर्माण करणारे आहे. त्यांनी पुढे सांगितले की क्षमता आणि उत्पादन या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला देशात उत्पादन करणार्‍या दोन लस उत्पादकांनी तयार केलेल्या वास्तविक लसींच्या डोसबाबत माहिती घेणे गरजेचे आहे. एकदा का आपल्याला वास्तवात किती लसी उत्पादन होऊ शकता याची माहिती मिळाली की आपल्याला प्रत्येक तारखेनुसार लसींचा कसा आणि कोणाला पुरवठा झाले हे सांगता येईल.

कोरोना : सलग दुसर्‍या दिवशी रुग्‍णसंख्‍येत घट 

आपल्या देशातील दोन लस उत्पादक कंपन्यांची क्षमता, वास्तविक उत्पादन, प्रमाण, वितरणी आणि ग्राहकांची यादी याचे कॅग द्वारे पूर्ण ऑडिट झाले पाहिजे. लसींच्या तुटवड्याबाबत लोकांची नाराजी रस्त्यावर उतरण्याआधी आपल्याला लसींचे डोस गायब कसे होत आहेत याचे रहस्य उलगडायला हवे. असे म्हणत पी. चिदंबरम यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

Back to top button