केरळात कोरोना लसीकरण झालेल्या ४० हजार जणांना कोरोनाची लागण | पुढारी

केरळात कोरोना लसीकरण झालेल्या ४० हजार जणांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केरळमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या तब्बल ४० हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका उच्च पदस्थ सूत्रांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

केरळमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांचे कवच काेराेनाने भेदले आहे. या संबंधी केंद्र सरकारने केरळ सरकारला अशा केसेस जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यास सांगितले आहे. त्यानंतर बाधित व्यक्तीच्या शरिरातील विषाणूचे सॅम्पल घेऊन त्यांची तुलना इतर बाधित व्यक्तींशी केली जाणार आहे.

प्रतिकार शक्ती भेदणारा कोरोना चिंताजनक

सूत्रांच्या म्हणण्यानुसार जर कोरोना विषाणू म्यूटेट झाला असेल तर ती खरोखर चिंतेची बाब आहे. कारण कोरोना लसीकरण झालेल्या व्यक्तीची प्रतिकार शक्ती भेदू शकेल इतका विषाणू म्युटेट झालेला आहे.

अजून तरी भारतात पहिल्यांदा सापडलेला डेल्टा व्हेरियंटमुळे कोरोना लसीलाही न जुमानणारा संसर्ग सुरु झाला आहे का नाही, हे स्पष्ट झाले नाही. कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्यांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण हे पथनमथिट्टा जिल्ह्यात सर्वाधिक आहे.

पथनमथिट्टामध्ये कोरोना लसीचा पहिला डोस दिलेल्या १४ हजार ९७४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.  दुसरा डोस दिलेल्या ५ हजार ०४२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोरोनाची पुन्हा लागण होणे अशक्य आहे असे नाही पण, त्याचे प्रमाण अत्यल्प आहे. केरळमधील काही जिल्ह्यात अशा घटना घडल्या आहेत.

कोरोना झालेल्यांचेही लसीकरण आवश्यक

कोरोनाची पहिल्यांदाच बाधा होण्यापासून बचावासाठी लसीकरण हे महत्वाचे आहे. पण याचबरोबर आता ज्यांना कोरोना झाला आहे त्यांच्यासाठी लसीकरण गरजेचे आहे. केरळमध्ये गेल्या काही आठवड्यापासून दिवसाला २० हजारच्या वर कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

यात  मोठी घट झालेली आढूळन आली. काल २४ तासात १३ हजार ०४९ नवे कोरोना बाधित आढूळन आले तर १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आत २१ हजार ११९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहेत तर १५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : येत्या काळात नोकरीच्या अनेक संधी

 

Back to top button