कुणबी साडी : 'गोव्यातील प्रसिद्ध कुणबी साडीला भौगोलिक मानांकन' | पुढारी

कुणबी साडी : 'गोव्यातील प्रसिद्ध कुणबी साडीला भौगोलिक मानांकन'

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील प्रसिध्द कुणबी साडी ला भौगोलिक मानांकन (जिओग्राफीकल इन्डीकेशन, जी.आय) देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहे. गोव्याची पारंपरिक कुणबी साडी जगभरात प्रसिध्द व्हावी, या अनुषंगाने कुणबी साडी निर्मितीचे केंद्रही राज्यात स्थापन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे विविध स्तरावरून स्वागत होत आहे.

जशी महाराष्ट्राची पैठणी, कर्नाटकाची इल्कल साडी तसेच अन्य राज्यातील साड्या जगभर प्रसिद्ध आहेत.

गोव्याच्या कुणबी साडीचे हवे तसे ब्रॅण्डींग अजून झालेले नाही.

कुणबी कापड तयार करण्याच्या प्रमाणातही पूर्वीपेक्षा आता घट झाली आहे.

त्यामुळे या साडीला प्रोत्साहन देऊन सदर साडी तयार करणारे कारागीर तयार व्हावेत, तसेच या कापड निर्मितीतून लोकांना रोजगार मिळण्याच्या दृष्टिकोनातूनही सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

गोवा खादी व ग्रामोद्दोगतर्फे साडी नार्मिती आणि विक्री केली जाते. त्याशिवाय काही खासगी दुकानांतूनही (Boutique) ही साडी विकतात.

त्याशिवाय कर्नाटक व केरळमध्येही साडी विक्री केली जाते. सामाजिक माध्यमाचा वापरही या साड्यांच्या विक्रीसाठी केला जातो.

हेही वाचलं का? 

Back to top button