आणखी दोन वर्षे मीच मुख्यमंत्री : येडियुराप्पा  | पुढारी

आणखी दोन वर्षे मीच मुख्यमंत्री : येडियुराप्पा 

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा  भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी पक्षश्रेष्ठींचे म्हणणे जाहीर केल्याने आपली जबाबदारी वाढली आहे. आणखी दोन वर्षे नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याने मुख्यमंत्रिपदी मीच असेन, असे येडियुराप्पा यांनी सांगितले. 

हासन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नेतृत्वबदलाची अफवा होती. प्रसारमाध्यमांमध्ये याविषयी अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे जबाबदारी वाढली आहे. त्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल. 

गेल्या महिन्याभरापासून कर्नाटकात नेतृत्वबदलाची चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याविरुद्ध काही आमदारांनी सही संग्रह मोहीम हाती घेतली होती; पण पक्षश्रेष्ठींनी विरोधकांना आल्या पावली माघारी पाठवले होते. गुरुवारी भाजपचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना अभय दिले.

Back to top button