भाजप : वर्षात तब्बल ३ हजार ६२३ कोटींची कमाई, देणगीत ५० टक्क्यांनी वाढ | पुढारी

भाजप : वर्षात तब्बल ३ हजार ६२३ कोटींची कमाई, देणगीत ५० टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

केंद्रात सत्तेत असलेला भाजप वार्षिक कमाईत सर्वच राष्ट्रीय पक्षांच्या फार पुढे आहे. २०१९ – २० या आर्थिक वर्षात भाजपने इलेक्‍टाेरल बाँडच्‍या (राेखे) माध्‍यमातून मिळालेल्‍या देणगीत आणि खर्चात दोन्हीत वाढ झाली आहे. गतवर्षीच्या अहवालानुसार भाजपला तब्बल ३ हजार ६२३ कोटी रुपये देणगी मिळाली आहे.  २०१८-१९ या गेल्या आर्थिक वर्षात भाजप ने २ हजार ४१० कोटी रुपये कमवले होते. याचा अर्थ भाजपला मिळालेल्‍या देणगीत एका वर्षात जवळपास ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सर्व राष्ट्रीय पक्षांपेक्षा तीन पट जास्त कमाई

देणगीत काँग्रेस भाजपपेक्षा  फारच पिछाडीवर आहे. २०१९ – २० या आर्थिक वर्षात त्यांनी फक्त ६८२ कोटी रुपयेच कमवले. विशेष म्हणजे भाजपने गेल्या आर्थिक वर्षात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी, बसप, सीपीएस आणि सीपीआय यांच्या एकूण कमाईच्या तीन पट कमाई केली आहे.

भाजप च्या पारड्यात जसे भरभरुन दान पडले आहे. त्याच प्रमाणे भाजपने गेल्या आर्थिक वर्षात अत्यंत सढळ हाताने खर्चही केला आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार भाजपने २०१९ – २० या आर्थिक वर्षात १ हजार ६५१ कोटी रुपये खर्च केले आहेत. त्याच्या मागच्या आर्थिक वर्षात खर्चाचा आकडा हा १ हजार ००५ कोटी रुपये इतका होता. अशा प्रकारे भाजपचा खर्च एका वर्षात जवळपास ६४ टक्यांनी वाढला आहे.

निवडणूक बाँडमधून सर्वाधिक कमाई

निवडणूक आयोगाकडून केल्या गेलेल्या वर्षिक ऑडिटिंगनुसार भाजपला आर्थिक वर्ष २०१९- २० मध्ये निवडणूक बाँडमधून २ हजार ५५५ कोटी रुपये मिळाले. आर्थिक वर्ष २०१८ – १९ मध्ये भाजपने १ हजार ४५० कोटी रुपये निवडणूक बाँड मधून मिळाले होते. त्यापेक्षा २०१९ -२० मध्ये ७६ टक्के जास्त रक्कम निवडणूक बाँडमधून मिळाले आहेत.

भाजप ने निवडणुकांवर गेल्या दोन आर्थिक वर्षात अनुक्रमे १ हजार ३५२ कोटी रुपये आणि ७९२.४० कोटी रुपये खर्च केले होते. भाजपने गेल्या आर्थिक वर्षात काँग्रेसपेक्षा ५.३ पटीने जास्त कमाई केली आहे. काँग्रेसने २०१९ – २० या आर्थिक वर्षात ६८२ कोटी रुपये कामाई केली होती. त्याच वर्षी काँग्रेसने ९९८ कोटी रुपये खर्च केले होते. तर भाजपचा खर्च हा त्यांच्या तुलनेत १.६ पट जास्त होता.

 भाजपला मिळालेल्‍या देणगीत वाढ काँग्रेसची घसरण

भाजपची कमाई गेल्या आर्थिक वर्षात ५० टक्यांनी वाढली तर काँग्रेसची २५ टक्यांनी कमी झाली. भाजप ला २ हजार ५५५ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडमधून मिळाले तर ८४४ कोटी इतर माध्यमातून मिळाले. पक्षाने सांगितल्याप्रमाणे २९१ कोटी रुपये हे त्यांना वैयक्तिक दानातून मिळाले आहेत तर २३८ कोटी रुपये कंपन्यांकडून, २८१ कोटी रुपये संस्थांनी तर ३३ कोटी रुपये इतर घटकांकडून मिळाले आहेत.

पक्षाच्या विविध मोर्चांमार्फात ५ कोटी तर बैठकांमधून ३४ कोटी रुपये मिळाले आहेत. अर्ज शुल्काच्या मार्फत २८ लाख डेलिगेट फीमधून जवळपास १.३ कोटी रुपये आणि सदस्यता शुल्क २०.१ कोटी रुपये मिळाले आहेत

राष्ट्रीय पक्ष भाजप चा खर्चाचा ताळेबंद

आर्थिक वर्ष २०१९ – २० मध्ये भाजपने जाहीरातींवर ४०० कोटी रुपये खर्च केला. त्याच्या गेल्या वर्षी त्यांनी २९९ कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले आहेत. पक्षाने इलेक्ट्रॉनिक मीडियावर २४९ कोटी रुपये खर्च केले आहेत तर प्रिंट मीडियावर ४७.७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा आकडा २०१८ – १९ या आर्थिक वर्षात अनुक्रमे १७१.३ कोटी आणि २०.३ कोटी इतका आहे.

पक्षाने आपल्या नेत्यांच्या हवाई प्रवासासाठी २५०.५० कोटी रुपये खर्च केला आहे. यापूर्वीच्या वर्षी तो फक्त २०.६३ कोटी इतकाच होता. याचे एक महत्वाचे कारण म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक. भाजपने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सुमारे १९८.३ कोटी रुपये उमेदवारांना आर्थिक मदतीच्या रुपात देण्यात आली. २०१८-१९ या वर्षी ही मदत फक्त ६०.४ कोटी रुपये इतकीच होती.

हेही वाचले का?

पाहा व्‍हिडीओ : प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळतंच : विश्वास नांगरे -पाटील

 

 

Back to top button