देशभरात २४ तासांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येत सात हजारांनी घट | पुढारी

देशभरात २४ तासांमध्‍ये कोरोना रुग्‍णसंख्‍येत सात हजारांनी घट

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन : देशभरात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्‍याचे चित्र आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात सलग चौथ्‍या दिवशी ४० हजारांहून कमी नवे रुग्‍ण आढळले. देशभरात मागील २४ तासांमध्‍ये कोरोनाचे २८ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण आढळले. तर ३७३ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. २४ तासांमध्‍ये २८ हजारांहून अधिक नवे रुग्‍ण आढळले असले तरी ४१ हजारांहून अधिक रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. देशात आता कोरोनामुक्‍तची टक्‍केवारी ९७.४९ इतकी झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य मंत्रालयाने दिली.

देशात मागील २४ तासांमध्‍ये २८ हजार २०४ नवे रुग्‍ण आढळले. ४१ हजार ५११ रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. एका दिवसात सात हजारांहून अधिक रुग्‍णसंख्‍या कमी झाल्‍याने आरोग्‍य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांमध्‍ये ५४ लाख ९१ हजार ६४७ जणांचे लसीकरण झाले.

देशात आतापर्यंत ३ कोटी १९ लाख ९८ हजार १५८ जणांना कोरोनाची बाधा झाली. सध्‍या ३ लाख ८८ हजार ५०८  रुग्‍णांवर  उपचार सुरु आहेत. आतापर्यंत ३ कोटी ११ लाख ८० हजार ९८६ जणांनी कोरोनावर मात केली. ४ लाख २८ हजार ६८२ जणांचा कोरोनाने बळी घेतला. ५१ कोटी ४५ लाख २६८ जणांचे लसीकरण झाले आहे, अशी माहिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का ? 

Back to top button