उज्‍ज्‍वला योजना २.० अंतर्गत कायमचा पत्ता नसणार्‍यांनाही मिळणार गॅस सिलिंडर कनेक्‍शन | पुढारी

उज्‍ज्‍वला योजना २.० अंतर्गत कायमचा पत्ता नसणार्‍यांनाही मिळणार गॅस सिलिंडर कनेक्‍शन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : उज्‍ज्‍वला योजना २.० जाहीर करताना घरगुती गॅस सिलिंडर कनेक्‍शनबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा केली. उज्‍ज्‍वला योजना २.० अंतर्गत ज्‍यांना कायमचा पत्ता नाही, अशा नागरिकांनाही आता घरगुती गॅस सिलिंडर कनेक्‍शन मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील महेबा येथे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थींना घरगुती गॅस सिलिंडर वितरण करुन उज्‍ज्‍वला योजनाच्‍या दुसर्‍या टप्‍प्‍पास प्रारंभ केला. या योजनेचा मोठा लाभ स्‍थलांतरीत कामगारांना होणार आहे.

यापूर्वी घरगुती गॅस कनेक्‍शनसाठी कायमस्‍वरुपी पत्ता आवश्‍यक होता. मात्र आता उज्‍ज्‍वला योजनेअंतर्गत स्‍थलांतरीत कामगारांना कायमस्‍वरुपी पत्ता नसला तरी गॅस सिलिंडर कनेक्‍शन मिळणार असल्‍याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

यावेळी त्‍यांनी लाभार्थींशी व्‍हिडीओ कॉन्‍फरसिंगच्‍या माध्‍यामातून संवादही साधला.  केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ उपस्‍थित होते.

स्‍थलांतरीत कामगारांना मिळणार लाभ

यावेळी पंतप्रधान मोदी म्‍हणाले, बुंदेलखंडसह उत्तर प्रदेश आणि अन्‍य राज्‍यांतील अनेक नागरिक हे कामानिमित्त दुसर्‍या राज्‍यांमध्‍ये जातात. येथे त्‍यांना घरगुती गॅस सिलिंडरचे कनेक्‍शन मिळविण्‍यासाठी कायमस्‍वरुपी पत्ता देण्‍याची अट होती.यामुळे लाखो कुटुंब घरगुती गॅस कनेक्‍शनपासून वंचित राहत होते.

आता उज्‍ज्‍वला योजनेच्‍या दुसर्‍या टप्‍प्‍यात कायमस्‍वरुपी पत्ता नसला तरी गॅस कनेक्‍शन मिळणार आहे. ही योजना लाखो कुटुंबाना दिलासा मिळणार आहे, असेही मोदी म्‍हणाले.

मागील सात दशकांमध्‍ये काही गोष्‍टी आपल्‍याला बदलत्‍या आल्‍या असता. यामध्‍ये घर, वीज, पाणी, शौचालय, घरगुती गॅस सिलिंडर कनेक्‍शन, आरोग्‍य सुविधा, शाळा अशा अनेक मूलभूत सुविधा उभारता आल्‍या असता. मात्र याची पूर्तता होण्‍यासाठी देशवासियांना अनेक दशकांची वाट पाहवी लागली, अशी अप्रत्‍यक्ष टीकाही त्‍यांनी तत्‍कालिन काँग्रेस सरकारवर केली.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ :नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची ‘फोनाफोनी’!!

 

Back to top button