जम्‍मूत पुन्‍हा आढळले ड्रोन | पुढारी | पुढारी

जम्‍मूत पुन्‍हा आढळले ड्रोन | पुढारी

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्‍मूत बुधवारी पहाटे पुन्‍हा एकदा ड्रोन आढळले. कालूचाक आणि कुंजवानी परिसरातील हवाई दलाच्‍या छावणीजवळ ड्रोन फिरताना दिसले. तीन दिवसांमध्‍ये सलग चौथ्‍यांदा ड्रोन आढळल्‍याने सुरक्षा दलास सतर्कतेचे आदेश दिले आहेत. जम्‍मू विमानतळावर रविवारी पहाटे ड्रोनच्‍या सहायाने स्‍फोट घडवून आणण्‍यात आले होते. ड्रोन्‍सच्‍या मदतीने दहशतवाद्‍यांनी केलेला हा पहिलाचा हल्‍ला होता.  

अधिक वाचा : ट्विटरवर चौथा गुन्हा दाखल, चाइल्ड पोर्नोग्राफीसंबंधी कारवाई

धवारी पहाटे कालुचक परिसरात ४.४० वाजता तर कुंजवानी भागात ४.५२ मिनिटांनी हवाई दलाच्‍या छावणीजवळ ड्रोन आढळले. सलग चौथ्‍यांदा आणि २४ तासांमध्‍ये दुसर्‍या ड्रोन निदर्शनास असल्‍याने सैन्‍यदलास सतर्कतेचे आदेश देण्‍यात आले आहेत. सुरक्षा दलांनी परिसरातील शाेध माेहिम तीव्र केली आहे.  

अधिक वाचा :कोरोना : रुग्‍णसंख्‍येत पुन्‍हा वाढ, मृत्‍यू संख्‍या घटली

जम्मू हवाई दलाच्‍या केंद्रावरील ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सुपूर्द करण्‍यात आला आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने दहशतवादी संघटनांच्या मदतीने हा ड्रोन हल्ला घडवून आणला असल्याचा अंदाज आहे. हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी जम्मू येथील कालूचाक लष्करी केंद्राजवळ दोन ड्रोन दिसले होते. या ड्रोन्सना पाडण्यासाठी लष्कराकडून गोळीबार करण्यात आला होता. ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू विभागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ड्रोन दिसताचा गोळीबार करण्‍याचे आदेश देण्‍यात आले आहेत. 

अधिक वाचा : देशात मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरास मंजुरी

 

Back to top button