बुलडोझर कारवाईसंबंधी अहवाल सादर करा : केजरीवाल सरकारचे तिन्ही महानगरपालिकांना आदेश | पुढारी

बुलडोझर कारवाईसंबंधी अहवाल सादर करा : केजरीवाल सरकारचे तिन्ही महानगरपालिकांना आदेश

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
राजधानी दिल्लीत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिक्रमणविरोधी अभियानासंबंधी राज्यातील केजरीवाल सरकारने महानगर पालिकांना विस्तृत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने उत्तर, दक्षिण तसेच पूर्व दिल्ली महानगरपालिकेला नोटीस बजावले असून, दिल्लीत सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईसंबंधी हा रिपोर्ट सादर करण्यास सांगितले आहे. महानगरपालिकांनी एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईसंबंधी माहिती सादर करीत आकडेवारी उपलब्ध करवून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

दरम्यान उत्तर दिल्ली महानगरपालिकेने मंगळवारी (दि.१७) अतिक्रमणविरोधी कारवाई करीत रिठाला मेट्रो स्टेशनपासून पोलीस चौकीपर्यंत अतिक्रमण हटवण्यात आले. दरम्यान, बुलडोझर कारवाई दृष्टिपथात येताच अतिक्रमणधारकांनी आपले साहित्य हटवून घेतले. कारवाई दरम्यान रस्त्याच्या कडेला ८०० मीटर परिसरातून अतिक्रमण हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अतिक्रमण कारवाईपूर्वीच ४०० ते ४५० अतिक्रमण धारकांनी स्वत:हून रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. रहदारीत अडथळा निर्माण होवू नये, तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. यापूढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button