पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022)मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद (SRH)चा कर्णधार केन विल्यमसनने (Kane Williamson) मोठा निर्णय स्वत:च्या संघाला धक्का दिला आहे. विल्यमसन आयपीएल 2022 सोडून मायदेशी रवाना झाला आहे. त्याने हा निर्णय एका खास कारणासाठी घेतला आहे. चला तर तो नेमका कोणत्या कारणासाठी न्यूझीलंडला परत गेला हे जाणून घेऊया…
मंगळवारी झालेल्या सामन्यात हैदराबादने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा (MI) अवघ्या 3 धावांनी पराभव करत रोमहर्षक विजय मिळवला. त्यामुळे हा संघ सहाव्या विजयासह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. आता या संघाचा एकच सामना शिल्लक आहे, जो 22 मे रोजी पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध होणार आहे. प्लेऑफसाठी हैदराबाद संघाला शेवटचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. तसेच, त्यांना दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) च्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. (Kane Williamson)
वास्तविक, न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनची (Kane Williamson) पत्नी सारा रहीम (Sarah Raheem) दुसऱ्या मुलाला जन्म देणार आहे. यामुळेच प्रसूतीच्या वेळी विल्यमसनला पत्नीसोबत राहायचे आहे. यामुळेच तो संघासाठी शेवटचा सामना खेळणार नाही. सनरायझर्स फ्रँचायझीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
हैदराबाद संघ व्यवस्थापनाने ट्विट केलंय की, आमचा कर्णधार केन विल्यमसन (Kane Williamson) त्याच्या मायदेशी अर्थात न्यूझीलंडला परतणार आहे. फ्रँचायझी कॅम्पचे सर्व सदस्य विल्यमसन आणि त्याच्या पत्नीला सुरक्षित प्रसूतीसाठी शुभेच्छा देत आहेत. त्याच्या घरी खूप आनंद येवो ही पार्थना..
केन विल्यमसनने यंदाच्या हंगामात अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. त्याची बॅट काही खास प्रदर्शन करू शकली नाही. त्याला केवळ एकच अर्धशतक ठोकता आले. या हंगामात त्याने संघासाठी 13 सामने खेळले असून 19.64 च्या सरासरीने 216 धावा केल्या आहेत. हैदराबादने 13 पैकी 6 जिंकले आहेत. सध्या हा संघ 12 गुणांसह 8व्या क्रमांकावर आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम असला तरी आशा नगण्य आहे.