Nashik : सात वर्षीय मुलाच्या गळ्यात अडकले एक रुपयाचे नाणे अन् मग काय… | पुढारी

Nashik : सात वर्षीय मुलाच्या गळ्यात अडकले एक रुपयाचे नाणे अन् मग काय...

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा

सध्या उन्हाळ्याच्या सुट्या सुरू आहेत. त्यामुळे लहान मुले पालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सोबतच, उन्हाळ कांदा साठवण करत असल्याने पालक देखील कामात व्यस्त आहेत. एकीकडे शेतीकाम आणि दुसरीकडे मुलांचे उद्योग अशी दुहेरी कसरत पालकांची होत आहे. त्यात मुलांनी कठीण पराक्रम केले असतील तर मात्र पालकांच्या मनात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. एका सात वर्षीय मुलाने एक रुपयांचे नाणे गिळल्याची घटना घडली. सुदैवाने तत्काळ मुलावर उपचार झाल्याने त्याच्या गळ्यात अडकलेले नाणे काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेच‌ा नि:श्वास सोडला. (Nashik)

चांदवड तालुक्यातील देवरगाव येथील ऋषीकेश गोधडे या सात वर्षीय मुलाने खेळता खेळता एक रुपयांचे नाणे गिळले. पालकांनी त्यास तातडीने पिंपळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी दुर्बिणद्वारे नाणे काढण्यासाठी वीस हजार रुपयांपर्यंत खर्च येणार असल्याचे सांगितले. गोधडे परिवाराची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी लासलगाव येथील डॉ. योगेश चांडक यांच्याशी संपर्क साधून घटनेची कल्पना दिली. डॉ. चांडक यांनी मुलास दाखल करून त्वरित उपचार चालू केले. एक्स रे काढून नाणे नेमके कुठे अटकले आहे, याची माहिती घेतली. फोलिस कॅथेटरच्या सहायाने पंधरा मिनिटांत हे नाणे डॉ. योगेश चांडक आणि डॉ. स्नेहल शेळके यांनी बाहेर काढले. नाणे बाहेर काढल्यानंतर ऋषिकेशच्या पालकांसह सर्वांनी निःश्वास सोडला. त्यानंतर अर्धा तासात ऋषिकेश यास घरी सोडण्यात आले. (Nashik)

हेही वाचा :

Back to top button