India China border :चीनी सैन्य डायरेक्ट बुलेट ट्रेनने अरुणाचल सीमेवर पोहोचले! | पुढारी

India China border :चीनी सैन्य डायरेक्ट बुलेट ट्रेनने अरुणाचल सीमेवर पोहोचले!

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : भारत आणि चीनच्या सीमेवर (India China border) पुन्हा चीनने कुरापत केली आहे. चीनने (China )पहिल्यांदाच आपल्या सैनिकांना बुलेट ट्रेनने भारताच्या अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर पाठवले आहे. १६० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने ही बुलेट ट्रेन तिबेटची राजधानी ल्हासाहून पीपल्स आर्मीच्या सैनिकांना घेऊन निंगची शहरात आली आहे. हे शहर अरुणाचल प्रदेशच्या सीमेच्या जवळ आहे.

चीनेने अरुणाचल प्रदेशच्या सिमेवर सैन्य (India China border) आणत भारताविरोधात शक्तिप्रदर्शन करत असल्याची चर्चा आहे.

तिबेटची राजधानी ल्हासामदून बुलेट ट्रेनने सैनिक अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळील निंगची शहरात पोहोचले आहे.

बुलेट ट्रेनने सैनिक तैनात

याबाबतची माहिती चीनची सरकारी वृत्तसंस्था ग्लोबल टाईम्सच्या माहितीनुसार ‘पीपुल्स लिबरेशन आर्मी’च्या नव्याने भरती झालेल्या जवानांना 4500 मीटर उंचीवरील एका अभ्यास क्षेत्रात नेण्यात आले.

पीएलएशी संबंधीत असलेल्या एका वेबसाईटनुसार ल्हासा ते निंगची बुलेट ट्रेनद्वारे पहिल्यांदाच या सैनिकांना नेण्यात आले आहे.

निंगची शहर हे रणनीतिक दृष्ट्या चीनसाठी महत्वाचे शहर आहे. कारण ते चीनचा डोळा असलेल्या अरुणाचल प्रदेशला लागून आहे.

चीन आणि भारतात ३४८८ किलोमीटर लाइन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलवरून वाद आहे.

त्यामुळे चीनने पुन्हा एकदा भारताविरुद्ध कुरापती करण्यास सुरुवात केली आहे. चीन अरुणाचल प्रदेशावर आपला दावा सांगत आहे.

मात्र भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. यापूर्वी या भागात हवाई तळांची उभारणी आणि क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत.

चीनने एप्रिल २०२१ च्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा घुसखोरी सुरू केली होती.

त्या वेळी काही चिनी ड्रोन विमाने भारतीय हद्दीत आली होती व त्यांनी या भागाची टेहळणी केली असे संरक्षण सूत्रांनी सांगितलं होतं.

हे ही वाचलं का?

Back to top button