

मुंबई ; पुढारी ऑनलाईन: राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि गायिका सावनी रवींद्र हिने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. मे महिन्यात पहिल्यांदा सावनी रवींद्र हिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना गुडन्यूज दिली होती.
सावनी आणि तिचा पती डॉ. आशिष धांडे यांना कन्यारत्र प्राप्त झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी दोघांवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
याआधी सावनीने डोहळे जेवणाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोसोबत बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात असल्याचे तिने सांगितले होते.
सावनीने मध्यंतरी तिच्या प्रेग्नंसीदरम्यानच एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त करताना सांगितले होते की, 'माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. आजवर मी गायिका म्हणून आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गाणी गायली आहेत. यात अंगाई गीत, डोहाळ जेवणाचे गीत, बारश्याची गाणी मी याआधी गायली होती. पण, आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.' अशी कॅप्शन तिने लिहिली होती.
जन्माला येणारे बाळ हे माझ्यासाठी लकी चार्म असल्याचे देखील म्हटलं होतं. कारण माझं बाळ पोटात असताना मला माझ्या आयुष्यातील इतका मोठा प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. सावनी रवींद्र आणि आशिष धांडे यांनी २०१८ मध्ये लग्नगाठ बांधली.
हेही वाचलंत का?