नाशिक : मित्राच्या वाढदिवसाला जाऊ न दिल्याने पंधरावर्षीय मुलाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : मित्राच्या वाढदिवसाला जाऊ न दिल्याने पंधरावर्षीय मुलाची आत्महत्या

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
मित्राच्या वाढदिवसाला जाण्यास घरच्यांनी विरोध केल्याचा राग आल्याने वरद प्रितम भालके (15) या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिन्नर येथे शनिवारी (दि. 14) रात्री 8 च्या सुमारास घडली.

देवी रोड परिसरातील राम नगरीतील अमित सुरेश गजेकर (43) यांचा भाचा वरद (15) याच्या मित्राचा शनिवारी वाढदिवस होता. मात्र, घरच्यांनी वाढदिवसाला जाण्यास विरोध केला. त्यामुळे तो आतल्या खोलीत जाऊन बसला. दरम्यान कुटुंबातील सदस्य टीव्ही बघत होते. बराच वेळ होऊनही वरद बाहेर न आल्याने त्यांनी खोलीचा दरवाजा तोडला असता वरदने गळफास घेतल्याचे आढळले. याबाबत पोलिस हवालदार चेतन मोरे पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button