क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड जवळच बसून होते दोन्ही श्‍वान! सायमंडस्च्या मृत्यूनंतरचे काळीज हेलावणारे द‍ृश्य | पुढारी

क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड जवळच बसून होते दोन्ही श्‍वान! सायमंडस्च्या मृत्यूनंतरचे काळीज हेलावणारे द‍ृश्य

मेलबर्न : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंडस्चा रविवारी कार अपघातात मृत्यू झाला. दरम्यान, अँड्र्यू प्रवास करत असलेल्या गाडीत कोणीही नव्हते. पण, त्याचे दोन पाळीव श्‍वान त्यावेळी त्याच्यासोबत असल्याची माहिती मेल ऑनलाईन या इंग्रजी वेबसाईटने दिली आहे. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार अँड्र्यूच्या मृत्यूनंतरही त्याचे पाळीव श्‍वान त्याच्यापासून लांब जायला तयार नव्हते. यातून श्‍वानाला माणसाचा सर्वात जवळचा मित्र का म्हटले जाते, चांगला मित्र का म्हटले जाते हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

अँड्र्यूच्या कारला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथे रविवारी अपघात झाला. अपघातानंतर काही मिनिटांतच बेबेथा नेलिमन आणि तिचा बॉयफ्रेंड वेलॉन टाऊनसन हे त्याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी पाहिले असता सायमंडस् तिथे निपचीत पडला होता. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आम्ही अपघाताच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा आम्हाला एक कार उलटलेली दिसली. त्यात एक माणूस आणि दोन श्‍वान दिसले. या श्‍वानांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने मालकाची बाजू सोडण्यास नकार दिला. अँड्र्यू आणि त्याच्या श्‍वानांमध्ये किती जवळीक होती हेच यातून अधोरेखित झाले. याआधीही अनेकदा श्‍वान त्यांच्या मालकांवर जीवापाड प्रेम करत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी पुन्हा त्याचा प्रत्यय आला.

Back to top button