SBI FD : आता घरात बसून ऑनलाईन उघडा SBI चे FD अकाऊंट !

SBI
SBI
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI FD) आपल्या बचत खातेदाराला 'फिक्स्ड डिपाॅजिट अकाऊंट' काढण्याची सुविधा देते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक गर्दीच्या ठिकाणी जाण्यास टाळतात. त्यामुळे SBI ने 'फिक्स्ड डिपाॅजिट अकाऊंट' (SBI FD) काढण्याची ऑनलाईन सुविधा दिलेली आहे. आता घरात बसून आपण अकाऊंट काढू शकतो.

त्याचबरोबर टर्म डिपाॅजिट हे नेट बॅकिंगद्वारे पेमेंट करू शकतो, त्यासाठी बॅंकेत जाण्याची गरज नाही. एकदा तुम्ही अकाऊंट काढलंत की, ऑनलाईन पद्धतीने डिपाॅजिट रिन्यू करू शकता किंवा बंद करू शकता.

अकाऊंट काढताना ग्राहकाला मॅच्युरिटी डेट, प्रिंसिपल अमाऊंट, पे आऊट फ्रिक्वेंसी, यासारखे पर्याय मिळतात. ग्राहकाला आपल्या गरजेनुसारे पर्याय निवडता येतात. पण, अकाऊंट सुरू करण्यापूर्वी अटी आणि सूचना जरूर वाचाव्यात. त्यामुळे घरात बसून कोणत्याही त्रासाविना हे अकाऊंट सुरू करू शकता.

… असं उघडा फिक्स्ड डिपाॅजिट अकाऊंट

SBI च्या वेबसाईटवर युजरनेम आणि पासवर्ड टाकून लाॅगइन करा.

होम पेजवर जाऊन 'डिपाॅजिट स्किम' यावर क्लिक करा. त्यानंतर 'टर्म डिपाॅजिट' पर्याय निवडा.

त्यानंतर मेन्यूच्या सर्वात वरच्या बाजूला येणाऱ्या 'फिक्स्ड डिपाॅजिट'वर क्लिक करावं लागेल.

तुमच्या गरजेनुसार एफडी निवडा आणि प्रोसीज पर्याय क्लिक करा.

जर, तुमच्या SBI चे इअनेक अकाऊंट्स असतील, ज्या अकाऊंटवरून पेमेंट करणार आहात, ते अकाऊंट सिलेक्ट करा.

एफडीची प्रिंसिपच व्हॅल्यू निवडा आणि 'अमाऊंट' काॅलमवर क्लिक करा.

जर, तुमचं वय ६० वर्षांहून अधिक असेल तर 'सीनियर सिटीजन' यावर क्लिक करा.

त्यानंतर मॅच्युरिटी डेट आणि इंटरनेट पे आऊट फ्रिक्वेंसी निवडा.

त्यानंतर अटी आणि सूचना वाचून सबमिट पर्यायावर क्लिक करा. तुमचं एफडी अकाऊंट तयार झालेलं असेल.

पहा व्हिडीओ : अपघातग्रस्तांना जीवन रक्षक १०८ अम्ब्युलन्स

हे ही वाचा…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news