कोल्हापूर : कोतवाल आणि पोलिस पाटलांकडून इंगळी गाव पेटवण्याची धमकी! | पुढारी

कोल्हापूर : कोतवाल आणि पोलिस पाटलांकडून इंगळी गाव पेटवण्याची धमकी!

पट्टण कोडोली ( जि. कोल्हापूर) ; पुढारी ऑनलाईन : मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील इंगळी गाव या पुराच्या पाण्यात १०० टक्के पाण्याखाली गेले.

पाणी ओसरल्यावर गावात महापुराबाबत बैठक बोलवण्यात आली. यावेळी कोतवाल, पोालिस पाटील आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यात कोतवाल आणि पोलिस पाटलांनी गाव पेटवीन अशी भाषा केल्याने प्रकरण एकदम चिघळले.

कोतवाल चंद्रकांत जाधव व पोलिस पाटील जावेद मुल्लाणी यांनी इंगळी गाव पेटवून देईन अशी धमकी देत ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण चांगलेच तापले. तलाठ्यांनी शासनाच्या सुचनेनुसारच पंचनामे केले जातील अशी भुमिका मांडली व बैठक संपवली.

दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य संदीप गुदले यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ठीक दहा वाजता इंगळी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पुराबाबत बैठक बोलवण्यात आली होती.

या मिटिंगमध्ये चर्चा सुरू असताना ग्रामपंचायत सदस्य संदीप गुदले यांनी ग्रामपंचायत सदस्यांना फक्त तलाठी यांच्यासोबत चर्चा करायची आहे. बाकीच्या नागरीकांनी बाहेर थांबावे अशी मागणी केली.

ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न

यावेळी कोतवाल चंद्रकांत जाधव व पोलिस पाटील जावेद मुल्लानी यांनी वाद घालत ग्रामपंचायत सदस्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बैठकीस बसू नाही दिले तर गाव पेटवीन अशी धमकी दिली. यानंतर या बैठकीस अडथळा आणत हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.

ग्रामपंचायत सदस्य संदीप गुदले यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी फक्त तलाठी यांच्यासोबत बोलावे अशी मागणी ठेवली होती. ही मागणी करत असताना चंद्रकांत जाधव व पोलीस पाटील या दोघांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

ग्रामपंचायत सदस्यांची २०१९ च्या वेळी पुरामध्ये १०० टक्के सानुग्रह अनुदान मिळाले याप्रमाणे यावर्षीही मागणी केली होती.

परंतु कोतवाल आणि पोलिस पाटील यांनी परस्पर गावचा सर्वे करत 100% सानुग्रह अनुदानासाठी जे पात्र नाहीत त्यांना दिले जाणार नाही असा आपलाच अहवाल तयार केला होता.

दरम्यान गावातील नागरीकांचे महापुरावेळी १०० टक्के स्थलांतर झाले होते. याचबरोबर गावही १०० टक्के पुर बाधीत होते.

याबाबत गावातील नागरीक सदस्यांकडे विचारणा करत आहेत. हे सानुग्रह मिळण्यासाठीच ही बैठक बोलवण्यात आली होती.

पोलीस पाटील यांनी दोन दिवसापूर्वी कांही शासकीय अधिकाऱ्यांना गावातील या भागात जास्त नुकसान होते आणि या भागात होत नाही अशी माहिती दिली.

त्यामुळे गावातील लोक त्यांच्यावर चिडून होते पुन्हा बैठकीमध्ये ते आल्यामुळे जमलेल्यांमधुन चिडून काहीतरी गैरप्रकार होवु नये यासाठी आम्ही फक्त तलाठ्यांनी थांबावं अशी सुचना केली होती.

गावाला पूर्ण वेळ तलाठी नाहीत. आम्हीही शासनाचेच सेवक आहोत. सदरचे पंचनामे करण्याचे काम आम्हीच करणार असून, वयक्तिक रोषापोटी आम्हाला बैठकीतून बाहेर काढत असल्याचा आरोप कोतवाल चंद्रकांत जाधव यांनी केला.

हे ही वाचलं का?

Back to top button