नवी दिल्ली : मधाची चव आणि त्याचा आरोग्यासाठी होणारा लाभ आपल्याला माहिती आहे. मात्र पांढरा मध गुणकारी कसा आहे, याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? अर्थातच आपण पाहतो व खातो तो मध तपकिरी रंगाचा असतो. मात्र कधी तुम्ही 'व्हाईट हनी' किंवा पांढरा मध खाल्ला आहे का?
मधाचा असाही एक प्रकार असतो व हा मध 'कच्चा मध' म्हणून ओळखला जातो. हा मध अल्फाफा, फायरवेड अशा काही झाडांच्या फुलांपासून मिळतो.
हा मध नेहमीच्या मधापेक्षाही अधिक गुणकारी असतो असे म्हटले जाते.
त्याला 'अँटीऑक्सिडंटस्चे पॉवरहाऊस'ही म्हटले जाते. त्यामध्ये 'अ' आणि 'ब' ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि झिंकसारखी अनेक पोषक घटक असतात.
फ्लेव्होनॉईडस् आणि फिनॉलिक ही द्रव्यं अँटीऑक्सिडंटस्च्या गुणांनी समृद्ध असतात.
हा मध खाल्ल्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.
पोटातील अल्सरसारख्या समस्यांमध्येही असा मध गुणकारी असतो. तसेच पचनक्रिया सुधारण्यासाठीही तो उपयुक्त ठरतो.