भारताचा जीडीपी दर साडेसात टक्के राहणार, आशियाई विकास बँकेचा अंदाज | पुढारी

भारताचा जीडीपी दर साडेसात टक्के राहणार, आशियाई विकास बँकेचा अंदाज

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर साडेसात टक्के इतका राहण्याचा अंदाज आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) व्यक्त केला आहे. युक्रेन आणि रशिया यांच्यादरम्यान सुरु असलेले युध्द, कोविड संकट तसेच अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात सुरु असलेली वाढ हे धोके भारतीय अर्थव्यवस्थेसमोर असल्याचे एडीबीने आपल्या ताज्या अहवालात नमूद केले आहे.

चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर साडेसात टक्के तर पुढील आर्थिक वर्षात हाच दर आठ टक्के इतका राहू शकतो, असे सांगतानाच एडीबीने दक्षिण आशियातील देशांचा एकत्रित जीडीपी दर क्रमशः सात आणि 7.4 टक्के राहू शकतो, असे नमूद केले आहे.

विकसित आशियाई देशांसाठी हाच दर क्रमशः 5.2 आणि 5.3 टक्के इतका राहू शकतो. वस्तू आणि सेवांच्या मागणीत होत असलेली वाढ तसेच निर्यातीमुळे आशियाई देशांना त्यांच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याची संधी असल्याचे अहवालात म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेनदरम्यानचे युद्ध हा आशियाई देशांच्या अर्थव्यस्थांना असलेला सर्वात मोठा धोका आहे, असे सांगून (Asian Development Bank) अहवालात पुढे म्हटले आहे की, युध्दामुळे सर्वच देशांत महागाईचा वणवा पेटला आहे. विशेषतः इंधनाची महागाई वित्त क्षेत्राला प्रभावित करु शकते. पूर्व आशियातील अनेक देशांमध्ये कोविडचे संकट पुन्हा वाढत आहे, त्याकडेही गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्थी आहेत कुठं? | स्मृतिदिन विशेष | इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत

Back to top button