इंधन दरात १६ दिवसांत १० रुपयांची वाढ : मुंबईत पेट्रोल दराने ओलांडला १२० रुपयांचा स्तर | पुढारी

इंधन दरात १६ दिवसांत १० रुपयांची वाढ : मुंबईत पेट्रोल दराने ओलांडला १२० रुपयांचा स्तर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे प्रति लिटरचे दर १०५.४१ तर डिझेलचे दर ९६.६७ रुपयांवर गेले आहेत. गेल्या १६ दिवसांत पेट्रोल दरात तब्बल १० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईतील पेट्रोल दराने देखील आता १२० रुपयांचा स्तर ओलांडला आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढ झाल्याचे कारण देत गेल्या २२ मार्चपासून तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढ सुरु आहे. सततच्या इंधन दरवाढीमुळे महागाई मात्र शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात झालेली इंधन दरवाढ अतिशय अल्प असल्याचे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी नुकतेच संसदेत सांगितले होते. ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल १२०.५१ रुपयांवर गेले असून डिझेल १०४.७७ रुपयांवर गेले आहे. प. बंगालमधील कोलकाता येथे दर क्रमशः ११५.१२ आणि ९९.८३ रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूतील चेन्नई येथे हेच दर क्रमशः ११०.९५ आणि १०१.०४ रुपयांवर गेले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button