Karnataka hijab row : कर्नाटकातील हिजाब वादात अल-कायदाची एंट्री! अल- जवाहिरीनं जारी केला ९ मिनिटांचा व्हिडिओ

Karnataka hijab row : कर्नाटकातील हिजाब वादात अल-कायदाची एंट्री! अल- जवाहिरीनं जारी केला ९ मिनिटांचा व्हिडिओ
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

कर्नाटकातील हिजाब वादात (Karnataka hijab row) आता अल कायदा (Al Qaeda) या दहशतवादी संघटनेने एंट्री केली आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमन अल- जवाहिरी (Ayman al-Zawahiri) याने एक व्हिडिओ प्रसारित करत हिजाब बंदी ही दडपशाही असल्याचे सांगत भारतीय मुस्लिमांना यावर प्रतिक्रिया देण्याचे आवाहन केले आहे. याबाबतचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

अल कायदाच्या अधिकृत शबाब माध्यमांद्वारे जारी केलेला आणि SITE या गुप्तचर गटाने verified केलेला हा नऊ मिनिटांचा व्हिडिओ आहे. त्यात ओसामा बिन लादेन नंतर अल कायदाचे नेतृत्व करणाऱ्या जवाहिरीने, कर्नाटकातील महाविद्यालयीन विद्यार्थिनी मुस्कान खानचा उल्लेख करत तिचे कौतुक केले आहे. या विद्यार्थिनीने हिजाबला विरोध (Karnataka hijab row) करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाशी सामना केला होता. तिने "अल्लाहू अकबर" असा जयघोष करत "जय श्री राम" घोषणेचा प्रतिकार केला होता.

"भारताची नोबेल वुमन" (The Noble Woman of India) असे शीर्षक असलेल्या आणि पोस्टर सोबत असलेल्या या व्हिडिओत जवाहिरी हा मुस्कान खानची स्तुती करण्यासाठी त्याने केलेली कविता वाचताना दिसत आहेत. त्याने पुढे म्हटले आहे की, व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खानबद्दल माहिती मिळाली. या आपल्या "बहीण"च्या कृतीने आणि तिच्या "तकबीरच्या आरोळ्या" पाहून आपण इतका प्रभावित झालो की तिचे कौतुक करण्यासाठी एक कविता लिहिण्याचा निर्णय घेतला. कविता वाचून झाल्यानंतर, जवाहिरीने पाकिस्तान आणि बांगलादेशसह हिजाबवर बंदी घातलेल्या देशांवर हल्लाबोल केला आहे. त्याने या देशांवर पाश्चात्य देशांचे मित्र असल्याचा आरोप केला आहे.

जवाहिरीचा हा नोव्हेंबर नंतरचा पहिलाच व्हिडिओ आहे. मोस्ट वॉन्टेड जेहादी दहशतवाद्यांपैकी एक असलेला जवाहिरी हा केवळ जिवंत नसून, त्याने मुस्कान खानच्या केलेल्या उल्लेखावरून तो सध्या देशांतर्गत घडामोडींमध्ये सक्रियपणे गुंतलेला असल्याचे या व्हिडिओवरुन स्पष्ट होते.

जवाहिरीचा मृत्यू २०२० मध्ये नैसर्गिक कारणांमुळे झाल्याची माहिती समोर आली होती. पण काही महिन्यांनंतर तो जिवंत असल्याचे सूचित करणारा एक व्हिडिओ समोर आला होता. तो अफगाणिस्तानात कुठेतरी लपला असण्याची शक्यता आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news