पुढारी ऑनलाईन डेस्क : IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) मोठी भेट दिली आहे. SEBI ने यासंबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. SEBI UPI द्वारे पेमेंट करण्याची मर्यादा वाढवल्याने, जो किरकोळ गुंतवणूकदार आहे त्यांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. १ मे पासून हा नवीन नियम लागू होणार असल्याचे SEBI ने एका पत्रकात सांगितले आहे.
जर तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टर असाल आणि कोणत्याही कंपनीच्या IPO मध्ये UPI द्वारे पेमेंट करत असाल तर, तुम्हाला या नियमाचा फायदा होणार आहे. SEBI च्या नव्या नियमानुसार, UPI द्वारे पेमेंट करणाऱ्यासाठी ही मर्यादा ५ लाखांपर्यंत करण्यात आली आहे. सध्या याद्वारे पेमेंट करण्याची क्षमता २ लाख इतकी आहे; पण हा नवीन नियम १ मे पासून येणाऱ्या प्रत्येक IPO साठी लागू होणार आहे. SEBI च्या एका प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये सांगितले आहे की, IPO साठी बोली लावणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांनी ५ लाखांपर्यंतच्या रक्कमेसाठी UPI Payment चा वापर करावा. याच बरोबर तुम्ही गुंतवणूकदार आवेदन फॉर्मवर आपला UPI Id सुद्धा देऊ शकतात.
SEBI चा हा निर्णय होण्यापूर्वीच NCPI ने UPI Payment Transection हा नियम चार महिन्यांपूर्वी आणला आहे. National Payments Corporation of India (NCPI) ने चार महिन्यापूर्वीपासूनच प्रति UPI Transection ची दाेन लाखांपासूनची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली आहे. SEBI ने गुंतवणूकदारांना UPI द्वारे पेमेंट करण्याची परवानगी २०१८ मध्येच दिली होती; पण खऱ्या अर्थाने २०१९ मध्ये हा नियम कार्यान्वित झाला.