Sanjay Biyani : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्‍या मारेकर्‍यांना तात्‍काळ अटक करा : मुख्यमंत्र्यांना निवेदन | पुढारी

Sanjay Biyani : बांधकाम व्यावसायिक संजय बियाणींच्‍या मारेकर्‍यांना तात्‍काळ अटक करा : मुख्यमंत्र्यांना निवेदन

 जवळाबाजार; पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या मारेकर्‍यांना तात्काळ अटक करा. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत करण्‍यात आली आहे. जवळाबाजार येथील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी व औंढा तालुका माहेश्वरी समाजातर्फे लेखी निवेदन देण्‍यात आले आहे.

बुधवार, ६ एप्रिल रोजी नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गाेळ्या झाडून खून करण्‍यात आला. ही  अत्यंत निंदनीय व निषेधार्थ घटना असून, मारेकर्‍यांना तात्काळ अटक करून न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी  असणारे निवेदन जवळा बाजार येथील विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी व औंढानागनाथ तालुका माहेश्वरी समाजातर्फे  मुख्यमंत्री यांना  तहसीलदार औंढा नागनाथ यांच्यामार्फत देण्यात आले. या निवेदनावर माहेश्वरी समाजाचे तालुकाध्यक्ष संजय सोमानी, नंदकिशोर बाहेती, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनीर पटेल, बाजार समितीचे सभापती अंकुशराव आहेर, माजी चेअरमण सतीश सोमानी, दत्ता आंबोरे, मुरलीधर मुळे, सुजित लखोटिया, निलेश सोनी, शंकर कदम, गोविंद दरक, ज्ञानेश्वर अंभोरे, विजय विभुते, विलास साखरे, प्रवीण चव्हाण, राजू पवार, राजकुमार जांजरी यांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.

अत्यंत कमी वेळात बांधकाम व्यवसायात मोठी झेप घेणारे  संजय बियाणी यांच्यावर मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी अगदी जवळून पाठीमागून त्यांच्यावर पिस्तलमधून चार गोळ्या झाडल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु, उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली होती.

हेही वाचलेत का? 

Back to top button