PM किसान : ‘ओटीपी’द्वारे eKYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित, ११ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट

PM किसान : ‘ओटीपी’द्वारे eKYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित, ११ वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या अपडेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

PM किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी eKYC अनिवार्य करण्यात आली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या १२.५३ कोटी शेतकऱ्यांसाठी या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अनिवार्य असणारी eKYC ची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली होती. पण सध्या पीएम किसान पोर्टलवर e-KYC चा का ऑप्शन दिसत नाही. यामुळे eKYC कशी करणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, PM Kisan website वरील माहितीनुसार, PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे. पण कृपया बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी (Biometric authentication) जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा. OTP द्वारे (OTP Authentication) आधार आधारित eKYC प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे."

PM किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हप्ता प्राप्त करण्यासाठी PM किसान लाभार्थ्यांनी eKYC पूर्ण करणे आवश्यक आहे. PM किसानचा पुढचा किंवा ११ वा हप्ता एप्रिलमध्ये कधीही तुमच्या खात्यात येऊ शकतो, परंतु जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर येणारा २ हजार रुपयांचा हप्ता थांबू शकतो, असे सांगण्यात आले होते.

पीएम किसान सन्मान निधी योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी ६ हजार रुपये शेतकर्‍यांना मदत स्वरुपात दिले जातात. प्रत्येकी २ हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यात ही रक्‍कम दिली जाते. योजनेचा दुरुपयोग टाळण्यासाठी पीएम किसान योजनेसाठीच्या नियमात सरकारकडून वरचेवर आवश्यक ते बदल केले जातात.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : ..आणि त्या शेतातल्या सगळ्या कामात तरबेज झाल्या : गोष्ट शेतकरी महिलेची | Story of Farmer Women

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news