shrilanka Crisis : राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा देण्‍यास गोटाबाया राजपक्षेंचा नकार

shrilanka Crisis : राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा देण्‍यास गोटाबाया राजपक्षेंचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांच्या नेतृत्वाखालील असंतुष्ट खासदारांनी सरकारमधून बाहेर पडण्याची योजना आखली आहे. (shrilanka Crisis) त्यामुळे श्रीलंकेचे राष्‍ट्रपती  गोटाबाया राजपक्षे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे बहुमत धोक्यात आले आहे. राष्‍ट्रपतीपदाचा राजीनामा देणार नाही, असे स्पष्ट करत ११३ जागांचे बहुमत सिद्ध करणाऱ्याला सरकार सोपवण्यास तयार आहे, असे गोटाबाया राजपक्षे यांनी म्हटले आहे.

(shrilanka Crisis) श्रीलंका सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि वीज कपातीमुळे नागरिक बेहाल झाले आहेत. अध्यक्षांनी मागील आठवड्यात आणीबाणीची घोषणा केली होती. आज २२५ सदस्यीय संसदेचे पहिले अधिवेशन आजपासून (मंगळवार) सुरू होत आहे. माजी अध्यक्ष सिरिसेना यांच्या नेतृत्वाखालील श्रीलंका फ्रीडम पार्टीचे असंतुष्ट खासदार श्रीलंकेतील सत्ताधारी पी कोडुजाना पेरामुना युतीतून बाहेर पडू शकतात. पक्षाच्या १४ खासदारांकडून हे पाऊल उचलले जाण्‍याची शक्‍यता आहे.

सरकारच्या अर्थसंकल्पावरील मतदानादरम्यान युतीला २२५ पैकी १५७ खासदारांचा पाठिंबा होता. मात्र, आता ५० ते ६० सदस्य यातून माघार घेणार आहेत, असे नाराज खासदार उदय गमनपिला यांनी सोमवारी सांगितले हाेते. त्यामुळे सरकार केवळ दोन तृतीयांश बहुमत गमावणार नाही. तर ११३ इतके साधे बहुमत देखील गमावेल.

विशेष म्हणजे, परकीय चलन संकट आणि पेमेंट बॅलन्सच्या समस्यांमुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्यास असमर्थता दर्शविल्याबद्दल सत्ताधारी राजपक्षे कुटुंबाविरोधात देशात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. लोक रस्त्यावर उतरून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू केल्याची घोषणा केल्यानंतर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news