कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरात आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी | पुढारी

कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मिरात आतापर्यंत फक्त ३४ लोकांकडून संपत्ती खरेदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : कलम ३७० संपुष्टात आल्यापासून इतर राज्यातील ३४ लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी केली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. ५ ऑगस्ट, २०१९ रोजी केंद्र सरकारने जम्मू- काश्मीरसाठीचे कलम ३७० संपुष्टात आणून जम्मू-काश्मीर तसेच लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली होती.

जम्मू-काश्मीरमधील संपत्ती खरेदीबाबत बसपाचे खासदार फजलुर रहमान यांनी प्रश्न उपस्थित केला होता. बाहेरच्या राज्यातील लोकांनी ज्या भागात संपत्ती खरेदी केली आहे. त्यात जम्मू, रियासी, उधमपूर आणि गांदरबल जिल्ह्यांचा समावेश आहे, असे नित्यानंद राय यांनी नमूद केले.

कलम ३७० संपुष्टात येण्याआधी तत्कालीन जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्राप्त होता आणि तेथे केवळ स्थानिक नागरिकच संपत्तीची खरेदी करू शकत होते. दरम्यान, गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत निमलष्करी दलाशी संबंधित बाराशे कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याची माहितीही सरकारकडून लोकसभेत देण्यात आली आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button