कहरचं! सलमानच्या चित्रपटाची कॉपी म्हणजे ऑस्कर विजेता CODA | पुढारी

कहरचं! सलमानच्या चित्रपटाची कॉपी म्हणजे ऑस्कर विजेता CODA

पुढारी ऑनलाईन डेस्क

चित्रपटांच्या दुनियेत सर्वात प्रतिष्‍ठेचा मानला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. अख्ख्या जगाचं लक्ष या सोहळ्य़ाकडे असतं. नुकताच यंदाचा ऑस्कर २०२२ पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटर येथे पार पडला. अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार देत अभिनेते-अभिनेत्रींचा सन्मान करण्यात आला होता. यंदाच्या वर्षात ‘कोडा’ CODA या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळालाय. (CODA)

२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या या कॉमेडी ड्रामा प्रकारातील चित्रपटाची पटकथा सियान हेदेरनं लिहिली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याचचं आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या La Famille Bélier चा इंग्रजी रिमेक असल्याचं म्हटलं गेलं.

तुम्हाला माहितीये का? या चित्रपटाची कथा १९९६ मध्ये सलमानचा चित्रपट खामोशीतील असल्याचे दिसून येते. हा चित्रपट १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खान याच्या एका चित्रपटाचा रिमेक असल्याचं वाटतं.

१९९६ मध्ये दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘खामोशी- द म्युझिक’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सलमान खान, मनिषा कोईराला, नाना पाटेकर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटामध्ये ऐकू आणि बोलू न येणाऱ्या पालकांची कहाणी असते. त्याची मुलगी ॲनी (मनिषा कोईराला) गायिका बनण्याचं स्वप्न पाहते, अशी कथा आहे. आता, एखाद्या बॉलिवूड चित्रपटावरून कोडासारखा हॉलिवूड चित्रपट रिलीज करून ‘त्या’ चित्रपटाला ऑस्करही मिळालं. तुमचं यावर काय मत आहे?

हेही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by The Academy (@theacademy)

Back to top button