नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: 'मला या पुढील आयुष्य मीरा सारखं कृष्ण भक्तीत व्यतीत करायचं आहे. यासाठी मी स्वेच्छा निवृत्ती घेत आहे', असे हरियाणातील आयपीएस अधिकारी भारती अरोरा यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जात भारती अरोरा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अरोरा यांनी २४ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला आहे.
या अर्जात म्हटलं आहे की, मला यापुढे आयुष्य मीरा सारख कृष्ण भक्तीत व्यतीत करायचय आहे. यापुढील काळ मी वृंदावनमध्ये व्यतीत करायचा असा निर्णय घेतला आहे. परमेश्वराने मला मार्ग दाखविला आहे. तसेच मानवतेसाठी माझ्यावर असणारी जबाबदारीही निश्चित केली आहे. याच मार्गाने माझी यापुढील वाटचाल असेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
पोलिस सेवा ही माझ्यासाठी नेहमीच ध्येयाने प्रेरीत असणारे कार्य राहिले. मात्र यापुढील आयुष्य हे पूर्णपणे अध्यात्मासाठी वाहून घेण्याचा निर्णय मी घेतला आहे. यापुढे मीराबाई आणि कबीरदास यांच्यासारखच प्रभू श्रीकृष्ण यांची साधना करण्याची माझी इच्छा आहे, असे ५० वर्षीय भारती अरोरा यांनी स्पष्ट केले आहे.
स्वेच्छा निवृत्तीसाठी आवश्यक असणारा तीन महिन्याचा नोटीस कालावधीही कमी करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
अरोरा या १९९८ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत.
२३ वर्षाच्या आपल्या पोलिस सेवेत त्यांनी अनेक प्रकरणांचा तपास केला.
१८ फेब्रुवारी २००७मध्ये पानिपनजवळ समझौता एक्सप्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपासही त्यांच्याकडे होता.
तीन महिन्यांपूर्वी त्यांनी हरियाणातील अंबाला परीक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली होती.
अंबाला येथे त्यांनी भाजपचे आमदार अनिल विज यांना अटक केली होती. यानंतर त्या चर्चेत आल्या.
आता त्यांनी राज्याचे मुख्य सचिव विजय वर्धन यांच्याकडे ३१ जुलैपर्यंत आल्याला निवृत्तीला मंजुरी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.
यापूर्वी दोन आयपीएस अधिकार्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारत अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. यामध्ये बहुचर्चित माजी आयपीएस अधिकारी देवेंद्र किशोर पांडा उर्फ डी. के. पांडा यांचा समावेश आहे.
देवेंद्र किशोर पांडा हे मूळचे ओडिशामधील. त्यांची नियुक्ती उत्तर प्रदेशमध्ये होती.
२००५मध्ये त्यांनी 'आपण दुसरी राधा आहेत, मी कृष्णाची प्रेमिका आहे', असा दावा केला.
महिलांची वेशभूषा करुन ते सार्वजनिक ठिकाणी भजन करु लागले. तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.१९९१ ते २००५ या कालावधीमध्येही ते खासगी जीवनात 'राधा' रुप धारण करत होते. मात्र ते सार्वजनिक जीवनात महिलाची वेषभूषा करुन आल्याने एकच खळबळ माजली होती.
बिहारचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनीही दोनवेळा स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली. मात्र दोन्ही वेळेस त्यांच्या पदरी निराशा पडली.
पांडा यांनी पहिल्याचा निवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. मात्र येथे त्यांचा अपेक्षाभंग झाला.
यानंतर पुन्हा एकदा स्वेच्छा निवृत्ती घेतल्यानंतर कथावाचक होत त्यांनी यापुढील आपले जीवन हे अध्यात्माच्या मार्गावरुनच जाईल, असे स्पष्ट कले होते.
आयपीएस रणबीर शर्मा आणि पंजाब पोलिसमध्ये पोलिस महानिरीक्षक राहिलेले कुंवरप्रताप सिंह यांनी एप्रिल २०२१मध्ये राजीनामा दिला होता.
या दोन्ही अधिकार्यांनी आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
हेही वाचलं का?