कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे नऊ फुटांनी उचलले | पुढारी

कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे नऊ फुटांनी उचलले

पाटण (जि. सातारा); पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण क्षेत्रात पडणारा पाऊस, संपुष्टात येत असलेली साठवण क्षमता व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे साडेपाच फुटांवरून नऊ फुटांवर उचलण्यात आले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता कोयना धरणाचे हे दरवाजे उचलण्यात आले.

कोयना धरणातून प्रतिसेकंद ४९,३४४ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे. कोयना नदीपात्रात होणारी वाढ पाणी लक्षात घेता नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणात प्रतिसेकंद सरासरी ४१,१९५ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे नऊ फुटांनी वर उचलून प्रतिसेकंद ४७,२४४ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.

 

कोयना धरण
कोयना धरण

पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून २१०० क्युसेक्स असे प्रतिसेकंद एकूण ४९,३४४ क्युसेक्स पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणात एकूण ९०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणाची सध्याची स्थिती पाहता एकूण पाणीसाठा ९०.४६ टीएमसी आहे. त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा ८५.३४ टीएमसी आहे. पाणी उंची २१५२ फूट, जलपातळी ६५५.९३० मीटर इतकी झाली आहे.

एक जूनपासून आत्तापर्यंतचा एकूण पाऊस पुढीलप्रमाणे : कोयना ३०१८ मिलिमीटर, नवजा ३८२५ मिलिमीटर, महाबळेश्वर ३८९७ मिलिमीटर असा आहे.

हे ही वाचा :

Back to top button