पुढारी ऑनलाईन डेस्क : पोटावरील चरबी कमी करण्याचे उपाय काय आहेत? यासाठी घरात बसल्याबसल्या काय करता येईल. पोटावरील चरबी, वाढलेल्या पोटाने त्रस्त असलेल्यांसाठी ही खास माहिती…
अधिक वाचा-
आधी मी खूप बारीक होते. आता शरीरावर चरबी वाढली आहे.
खासकरून पोटाच्यावरच्या बाजूने चरबी वाढलीय. मी आता बेढब दिसतेय. कपडेही कंबरेला घट्ट बसत आहेत.
कसं कमी करू वाढलेलं पोट? असाही प्रश्न तुम्हाला पडत असेल ना!.
पण, काळजी करू नका. घरच्या घरी तुम्हाला वाढलेलं पोट कमी करता येईल. यासाठी काही योगासने तुम्हाला करता येतील.
अधिक वाचा –
फार कठीण ही आसने नाही. तसं म्हटलं तर करायला सोपे आहेत. तर मग, ही पुढील माहिती शेवटपर्यंत वाचा.
गृहिणींना आपल्या आरोग्याकडे फारसं लक्ष देता येत नाही.
सकाळी घरातील कामं, स्वयंपाक, मुलांकडे लक्ष देणं, घरच्या मंडळींची सर्व कामं पाहणं.
अधिक वाचा-
तसेच महिला ऑफिसला जात असतील तर ९-१० तास एका जागी बसून काम करणं. यामुळे सर्वात जास्त ही समस्या महिलांना उद्भवते.
महिला असो वा पुरुष; वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी काही आसने करावी लागतील.
नियमित आसने केल्यामुळे वाढलेलं पोट तर कमी होईलचं. शिवाय वजनदेखील कमी होण्यास मदत होईल.
त्रिकोणासन करण्याची पध्दत – उभे राहा. दोन्ही पायात जास्तीत जास्त अंतर घ्या. आता उजव्या पायाचा तळवा फिरून बाहेरच्या दिशेने घ्या.
आता गुडघ्याच्या दिशेने वाका. एक हात समोर असलेल्या पायाच्या आतील बाजूस जमिनीवर टेकवा.
दुसरा हात छताच्या दिशेने वर घ्या. असाचं प्रकार दुसऱ्या बाजूनेही करावा.
नौकासनामध्य पोटावर दाब येतो. तसेच मांड्यावरही ताण येतो. हा ताण वाढलेले फॅट कमी करण्यासाठी उपयोगी आहे.
नौकासन करण्याची पद्धत – पाठीवर झोपून पाय सरळ ठेवावेत. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूने सरळ ताठ ठेवावे.
मोठा श्वास घेत बैठक (सीट) जमिनीला तशी टेकवून ठेवावी.
पाय ४५ अंशाच्या कोनात वर उचलावे.
बाकी मान, पाठ वरच्या दिशेने उचलत गुडघ्याच्या दिशेने उचलावे.
या स्थितीत १० ते १५ सेकंद थांबावे. पुढे सराव केल्याने अधिक वेळ एक आसन स्थिर ठेवता येईल.
पुन्हा हळूहळू श्वास सोडत पूर्वस्थितीत यावे.
भुजंगासन करण्याची पद्धत – पोटावर सरळ झोपा. दोन्ही हात मांड्यांच्या बाजूने सरळ ठेवा.
नंतर दोन्ही हात छातीच्या बाजूने जमिनीवर टेकवा.
कपाळ जमिनिला टेकवा. श्वास सुरळीत राहू द्या.
आता श्वास घेत डोकं, छाती, पोट जमिनीपासून वर उचला. (सुरुवातीला पोट थोडेचं वर उचलले जाईल.)
पाय मागे जमिनीला टेकून सरळ राहील.
धनुरासन करण्याची पध्दत – मॅटवर पोटावर झोपा. पाय मागे सरळ जोडलेले ठेवा.
कपाळ जमिनीला टेकवा.
आता पाय दुमडा. डोकं, छाती, पोट जमिनीपासून हळूहळू वर उचलत दोन्ही हाताने त्या-त्या पायाच्या घोट्याजवळ पकडा.
आता आसन सोडताना दोन्ही हात सोडा. पोट, छाती, कपाळ जमिनीला टेकवा.
दोन्ही पाय मागे सरळ करा.
सेतुबंधासन करण्याची पध्दत –आधी पाठीवर झोपावे. पायात थोडे अंतर घ्यावे. हाताचे तळवे जमिनीला टेकवावेत.
नंतर गुडघे दुमडलेले असावेत.
यावेळी पायाचा तळवा जमिनीला टेकलेलाचं असेल.
आता दोन्ही हाताने त्या-त्या पायाच्या घोट्याजवळ घट्ट पकडावे.
आता पाठ, पोट, कंबर जमिनीपासून वर उचलावे.
पोटावर ताण जाणवेल. सुरुवातीला १० ते १५ सेकंद हे आसन स्थर ठेवावं.
पुढे हा कालावधी २० सेकंदापर्यंत वाढवता येईल.
आसनावेळी चटई, योगा मॅट किंवा तत्सम अंथरूण घ्यावे.
परंतु, फार घाई न करता प्रत्येक आसन हळूहळू करावे.
यामुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला दुखापत होणार नाही.
नियमित आसने करावी.
पहाटे किंवा सकाळी अर्धा-पाऊण तासांच्या कालावधीत ही आसने पूर्ण होतात.
त्याचबरोबर, सूर्यनमस्कार देखील घातल्यास वजन कमी होण्यास मदत होते. तसेच शरीराला आकार मिळतो. पण, बॅड शेप निघून जाण्यास मदत होईल.
फास्ट फूड, अति तेलकट, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. फरसाण, शेव, तळलेला चिवडा, वेफर्स, पापडी असेही पदार्थ वर्ज्य करावेत.
अधिक वाचा-