पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका; राज्‍ससभेत विरोधकांकडून सरकार धारेवर | पुढारी

पेट्रोल आणि डिझेल दराचा भडका; राज्‍ससभेत विरोधकांकडून सरकार धारेवर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती स्वयंपाक गॅस (एलपीजी) बरोबर सर्वसामान्य वापराच्या वस्तूंच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत आहे. या मुद्द्यावरून विरोधी पक्षांतील नेत्‍यांनी आज राज्यसभेत प्रचंड गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज हे 10 मिनिटाच्या आतच थांबवण्यात आले. तसेच सभागृहाचे कामकाज हे दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

सभागृहाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू झाले. कामकाज सुरू करण्याआधी अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी शहीद दिनाचा उल्लेख केला आणि भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्यासह स्वातंत्र्य चळवळीत बलिदान दिलेल्या सर्व सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सर्व सदस्यांनी शहिदांच्या स्मरणार्थ काही काळ मौन पाळले.

दरम्‍यान, सभापतींनी काही कागदपत्रे सभागृहाच्या समोर ठेवली आणि पेट्रोल, डिझेल, एलपीजी, खाद्यतेल आणि आवश्यक वस्‍तूच्या किंमती वाढल्‍या आहेत यावरून समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल आणि शक्तीसिंह गोहिल आणि काही सदस्‍यांनी नियम 267 अंतर्गत नोटिसा दिल्या.

तसेच, सदस्‍यांनी या नोटिसा फेटाळून लावल्‍या. त्‍यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांना अनुदानाच्या मागणीचा मुद्दा करण्यात आला. याचा निषेध करत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, इतर पक्षांसह अनेक विरोधी पक्षातील नेत्‍यांनी गदारोळ केला आणि घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

यावेळी, नायडू यांनी गदारेळ करण्या-या सदस्यांना सांगितले की, 24 सदस्यांनी शून्य प्रहरमध्ये मुद्दे मांडावेत तसेच यावेळी गदारोळ केल्‍यानंतर अधिकारांचे उल्लंघन होईल असे सांगितले. परंतु विरोधी पक्षांच्या नेत्‍यांनी  जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली.

अध्यक्षांनी घोषणाबाजी, काही पोस्टर्स आणि फलक दाखवू नयेत असे सांगत पोस्टर्स दाखवणाऱ्या सदस्यांची नावे बुलेटिनमध्ये समाविष्ट केली जातील, असा इशारा ही त्यांनी यावेळी दिला. परंतु असे सांगूनही गदारोळ न थांबल्याने त्यांनी सकाळी 11.10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

विरोधी पक्षातील नेत्‍यांनी केलेल्‍या गदारोळामूळे सभागृहाचे कामकाज दोनदा तहकूब करावे लागले. तसेच शून्य प्रहराचा व प्रश्नोत्तर ही होऊ झाले नाहीत. तसेच बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ झाली.

हेही वाचलं का 

Back to top button