चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारतात | पुढारी

चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारतात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत आणि चीन यांच्यातला तणाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हे गुरुवारी भारतात येत आहेत. वांग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी होतो का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वांग हे दोन दिवस भारतात राहणार आहेत.

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनने केलेली दगाबाजी तसेच कोरोना संकटानंतर प्रथमच चीनचा मोठा नेता भारत दौऱ्यावर येत असल्याने देखील या दौऱ्याकडे सर्वांची नजर आहे. वांग यी यांचे पाकिस्तानमार्गे भारतात आगमन होईल. भारत दौरा आटोपून ते नेपाळला जाणार आहेत. भारतात ते परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह इतर नेत्यांची भेट घेणार आहेत. जयशंकर आणि यी यांची याआधी रशिया, तजाकिस्तान सहित इतर देशात भेट झालेली आहे. जयशंकर आणि यी यांच्या भेटीत रशिया – युक्रेन युध्दाचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

Back to top button