सांगली : घराच्या छतावर मगरीच्या दर्शनाने दहशत…! | पुढारी

सांगली : घराच्या छतावर मगरीच्या दर्शनाने दहशत...!

सांगली; पुढारी वृत्तसेवा: सांगली शहरासह पाच तालुक्यांतील महापूर आता ओसरू लागला आहे. परंतु, सांगली येथे पाण्यातून आलेल्या मगरींची धास्ती मात्र वाढू लागली आहे. मौजे डिग्रजमध्ये मगर आणि सांगलीवाडी येथे मगरीचे तीन पिले आढळली आहेत.

कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात मगरींचा वावर आहे. महापूर ओसरू लागल्यानंतर पात्राबाहेर पडलेल्या मगरींचे दर्शन आता शहरासह ग्रामीण भागात होऊ लागले आहे.

अधिक वाचा

दोन दिवसांपूर्वी सांगलीत दत्तनगर परिसरात महापुराच्या पाण्यातून मगर आली होती. मंगळवारी मौजे डिग्रज येथे एका घराच्या छतावर मगर बसलेली होती.

अधिक वाचा

महापुराबरोबर आलेली ही मगर पाणी ओसरल्यानंतरही घराच्या छतावरच अडकून राहिली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा

सांगलीवाडी येथे देखील मगरीची तीन पिले आढळून आली. या पिलांना नागरिकांनी महापुराच्या पाण्यात पुन्हा सोडण्यात आले.

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाखालील भराव गेला वाहून

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर चार ते पाच ठिकाणी रेल्वेमार्गाखालील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. रेल्वेमार्ग दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीला महापूर आला होता. त्यामुळे कोल्हापूर येथून सुटणार्‍या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मात्र, मिरज येथून महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती.

हेही वाचलंत का? 

Back to top button