विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल
Published on
Updated on

मुंबई, पुढारी ऑनलाईन :भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री मजूर सहकारी सोसायटी प्रकरणात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. दरेकर यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मजूर वर्गातून निवडणूक लढवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे यांची फिर्याद नोंदवून घेत माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात भादंवी कलम 199, 200, 406, 417, 420, 465, 467 आणि 120 (ब) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर हे मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून उभे राहिले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता.

आपच्या तक्रारीवरून सहकार विभागाने नोटीस बजावत, आपण मजूर आहात की नाही, अशी विचारणा दरेकर यांना केली होती.दरेकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात कुटुंबाची स्थावर मालमत्ता २ कोटी ९ लाख रुपये असल्याचे दाखवले होते. तसेच विरोधी पक्षनेते म्हणून दरेकर यांना २ लाख ५० हजार मानधन मिळत आहे. त्यामुळे आपण प्रथमदर्शनी मजूर असल्याचे दिसून येत नसल्याचेही नोटिशीत नमुदकेले होते. अखेर सहकार विभागाचे सह निबंधक बाजीराव शिंदे यांनी मजूर म्हणून दरेकर यांना अपात्र घोषित केले.

त्यानंतर आपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती

सहकार विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरुच ठेवली होती. शेवटी सहकार मंत्रालयाच्या नव्हे तर आम आदमी पक्षाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.

ही सुडबुद्धीने कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यात आला असून गिरीश महाजन यांच्याप्रमाणे आपल्याही विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. कायदेशीर प्रक्रियेने आपण याला न्यायालयात उत्तर देऊ, असे ही दरेकर म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news