नाशिक : घरात घुसून टोळक्याचा धुडगूस; हातात कोयते-चाकू घेऊन केली तोडफोड | पुढारी

नाशिक : घरात घुसून टोळक्याचा धुडगूस; हातात कोयते-चाकू घेऊन केली तोडफोड

नाशिकरोड : सामनगाव रोड परिसरातल्या अश्विनी कॉलनीतील म्हाडा बिल्डिंगमधील एका घरात चार जणांच्या टोळक्याने घुसून कोयते व चाकू हातात घेऊन धुडगूस घातला. तसेच घरातील गृहोपयोगी वस्तूंची तोडफोड करून नुकसान केले. या प्रकरणी चार जणांविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राधिका अशोक पवार (रा. अश्विनी कॉलनी, म्हाडा बिल्डिंग) यांनी नाशिकरोड पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या पतीने यापूर्वी झालेल्या भांडणात योगेश आहेर यांना हॉस्पिटलला का नेले होते, या कारणावरून व मुले त्यांच्यासोबत का राहतात, अशा दोन्ही कारणांवरून संशयित सागर पगारे, मनोज दोगले, कुणाल सूर्यवंशी, अंकुश चौधरी यांनी हातात कोयते व चाकू घेऊन घरातील सामानाची नासधूस, शिवीगाळ केली. तसेच विवेक अशोक जाधव याला तो योगेश आहेरसोबत का राहतो, या कारणावरून चौघांनी चाकूने पोटावर व छातीवर वार करून जखमी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button