उत्तराखंड : माजी मुख्यमंत्री हरिश रावत- डॉ. मोहन सिंग बिश्त यांच्यात चुरशीची लढत | पुढारी

उत्तराखंड : माजी मुख्यमंत्री हरिश रावत- डॉ. मोहन सिंग बिश्त यांच्यात चुरशीची लढत

पुढारी ऑनलाईन डेस्क : विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी होत असलेल्या विधानसभा निवडणूकीत लालकुआं मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. या मतदार संघात माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे उमेदवार हरिश रावत आणि सत्ताधारी पक्षाचे उमेदवार भाजपाचे डॉ. मोहन सिंग बिश्त यांच्याच काटें की टक्कर सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सकाळी १० वाजेपर्यंत भाजपा आघाडीवर आहे. आत्तापर्यंतच्या भाजपचे डॉ. मोहन बिश्त यांना ५३७२ तर, काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांना २६५९ मते मिळाली आहेत. यामध्ये भाजपचे बिश्त २७१३ मतांनी आघाडीवर होते. रावत लवकरच मुसंडी घेतील, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, काँग्रेसही काही जागांवर भाजपला कडवी टक्कर देताना दिसत आहे.

आत्तापर्यंत विधानसभेच्या १९ जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर काँग्रेस १२ जागांवर आघाडीवर आहे. २०१७ च्या भाजपच्या लालकुआं मतदारसंघात नवीन चंद्र दुमका यांनी कमळ फुलवले होते, परंतु २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांचे तिकीट नाकारत डॉ. मोहन सिंग बिश्त यांना उमेदवारी दिली आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुक प्रचारात भाजप आणि काँग्रेस पक्षांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.

लालकुआं मतदारसंघात ब्राह्मण, राजपूत मतदारांचे वर्चस्व

लालकुआं जागेवर ब्राह्मण आणि राजपूत मतदारांचे वर्चस्व आहे. एकूण मतदारांची संख्या १ लाख २० हजारांच्या जवळपास आहे, त्यात ६२६५० पुरुष आणि ५७३८० महिलांचा समावेश आहे. या विधानसभा मतदारसंघात ब्राह्मण आणि राजपूत मतदारांची संख्या जास्त आहे. मात्र, आत्तापर्यंत आओबीसी आणि अनुसूचित जातीच्या मतदारांची भूमिकाही निकालावर परिणाम करणारी ठरली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button