Assembly Elections 2022 : पहिल्या २ तासात ४ राज्यांमध्ये भाजप सुसाट; पंजाबात पहले 'आप' ! | पुढारी

Assembly Elections 2022 : पहिल्या २ तासात ४ राज्यांमध्ये भाजप सुसाट; पंजाबात पहले 'आप' !

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात तब्बल ३७८ दिवस झालेलं राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन, त्यानंतर मोदी सरकारने घेतलेली शरणागती, कोरोनाने देशात केलेला हाहाकार आणि त्यातून झालेलं मृत्यूतांडव आणि महागाईचा उडालेला भडाका, टोकदार होत चाललेल्या जातीय आणि धार्मिक अस्मिता या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमधील निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. (Assembly Elections 2022)

सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला असून सुरुवातीच्या दोन तासांमध्ये भाजपने ५ पैकी ४ राज्यात आघाडी घेत बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशात बहुमताची आघाडी (२०३ जागांवर) भाजपने घेतली असून समाजवादी पक्ष १०० जागांवर आघाडी घेतली आहे. अर्थातच हा सुरुवातीची आकडेवारी असल्याने यामध्ये बदल होऊ शकतो.

उत्तर प्रदेश

देशात सत्ता कोणाची येणार हे ठरवणाऱ्या उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणूक मतमोजणी होत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात २२२ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाने १११ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाचे करहालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथही आघाडीवर आहेत.

पंजाब

पंजाब विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्‍पष्‍ट होत आहेत. अपेक्षेप्रमाणे आम आदमी पार्टीने ८३ जागांवर मुसंडी मारत काँग्रेस धक्‍का दिला आहे. तर काँग्रेस १८ , अकाली दल ९ तर भाजप ५ जागांवर आघाडीवर आहे. (Punjab election result)

उत्तराखंड

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मजमोजणीच्या पहिल्या दोन तासात काँगेसने १३ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप १८ जागांवर आघाडीवर आहे. मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री हरीश रावत लालकुआं विधानसभा मतदार संघातून पुढे जाताना दिसत आहेत.

गोवा

गोव्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पणजीत भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी आघाडी घेतली तर साखळीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पिछाडीवर आहेत. साखळीत काँग्रेस उमेदवाराने आघाडी घेतली आहे. प्राथमिक कलानुसार प्रमोद सावंत ४३६ मतांनी पिछाडीवर आहेत. तर वाळपईत विश्वजित राणे यांनी २२७३ मतांची आघाडी घेतली आहे. ताळगावात जेनिफर मोन्सेरात यांनी आघाडी घेतली आहे. हळदोण्यात पहिल्या फेरीत भाजपचे ग्लेन टिकलो आघाडीवर आहेत.

मणिपूर

भाजप २९ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ८ जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष १७ जागांवर आघाडीवर आहे. भाजपला सर्वाधिक जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे काँग्रेस १० जागांवर पुढे आहे. तर अपक्ष १७ जागांवर आघाडीवर आहे.

Back to top button