पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत मजमोजणीच्या पहिल्या तासात काॅंग्रेसला जास्त जागा मिळालेल्या दिसत आहेत. आज ९ वाजता काॅंग्रेसला १३ जागांवर आघाडी मारलेली आहे तर, भाजपाच्या वाट्याला ११ जागांची वाढ मिळालेली आहे. यामध्ये मतमोजणीच्या प्रारंभीच्या टप्प्यात माजी मुख्यमंत्री हरीश रावत लालकुआं विधानसभा मतदार संघातून पुढे जाताना दिसत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात यांनी हरिश रावत सांगितले होते की, "उत्तराखंडंमध्ये काॅंग्रेसचंच सरकार बनविणार आहे."
उत्तराखंड राज्याची जनता पुढील ५ वर्षांचा सत्तेच्या कोणच्या हाती देते, हे आज दिवसभरात कळेल. उत्तराखंडात ७० विधानसभा जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरू झाली आहे. या राज्यात ६५ टक्के लोकांनी मतदान केलेली आहे. एक्झिट पोलनुसार भाजपा किंवा काॅंग्रेसला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, या दोन्ही पक्षात जोरदार टक्कर होईल किंवा त्रिशंकू विधानसभेचा शक्यता सांगितली जात आहे.
उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी विधानसभा निवडणूक आहे. विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे. विधानसभेवरील सत्तेसाठी किमान ३५ जागा मिळणे आवश्यक असते. उत्तराखंडात विधानसभा निवडणूक २०२२ सत्ताधारी पक्ष भाजप, काँग्रेससह आप आदमी पक्ष रणांगणात आहे. यांच्यात ही लढत होत आहे. भाजपला टक्कर देण्यासाठी नवीन चेहऱ्यांसह अनेक नवीन पक्ष मैदानात उतरले आहेत. तरीही खरी लढत ही भाजप, काँग्रेसमध्येच असल्याचे दिसत आहे.
निवडणुकीच्या निकालामध्ये करण्यात आलेल्या सर्वेत उत्तरखंडमध्ये भाजपची पुन्हा सत्ता येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असली तरी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसच्या हरीश रावत यांना सर्वाधिक पसंती दिली गेली आहे. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांना ३१ टक्के तर, भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना २८ टक्के पसंती दिली गेली आहे.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. याची मतमोजणी आज होत आहे. उत्तराखंडची स्थापना २००० मध्ये झाल्यानंतरची ही पाचवी निवडणूक आह़े राज्यात मतदानासाठी ११,६९७ मतदान केंद्रे आहेत़. उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते पुष्कर सिंह धामी , सत्पाल महाराज, सुबोध उनियाल, अरिवद पांडे, धनसिंह रावत आदी मंत्री रिंगणात आहेत़ काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री हरिश रावत, माजी मंत्री यशपाल आर्या आदी निवडणूक लढवत आहेत़. गेल्या विधानसभा निवडणुकीत (२०१७) भाजपला ७० पैकी ५७ जागांचे प्रचंड बहुमत मिळाले होत़े. काँग्रेसला केवळ ११ जागा जिंकता आल्या होत्या.
हे वाचलंत का?