गहना वशिष्ठ हिचा खुलासा; राज कुंद्रा शमिता शेट्टीला देणार होता ब्रेक

गहना वशिष्ठ हिचा खुलासा; राज कुंद्राकडून नव्या ॲपची तयारी, शमिता शेट्टीला देणार होता ब्रेक
गहना वशिष्ठ हिचा खुलासा; राज कुंद्राकडून नव्या ॲपची तयारी, शमिता शेट्टीला देणार होता ब्रेक
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गहना वशिष्ठ हिने मोठा खुलासा केला आहे. राज कुंद्राकडून नव्या ॲपची तयारी सुरू होती. त्यात तो शमिता शेट्टीला ब्रेक देणार होता. गहना वशिष्ठ हिने राज कुंद्रावर याआधाही आरोप केला आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात अडकलेले राज कुंद्राची कस्टडी आता २७ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे.

अधिक वाचा – 

याप्रकरणी शिल्पा शेट्टीला समन पाठवले नसल्याचे वृत्त समोर येत आहे.

अधिक वाचा – 

गहनाने दावा केला आहे की, राज कुंद्रा एक ॲप लॉन्च करण्याचे नियोजन करत होता आणि या माध्यमातून तो शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टीला मोठा ब्रेक देणार होता.

गहनाने या मुलाखतीत सांगितले की, ती स्वत: या चित्रपटांचे दिग्दर्शन करणार होती. पण, यासंबंधी तिची शमिता शेट्टीशी कधीच भेट झाली नाही. गहना केवळ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होती. शमिताशिवाय काही कलाकारांना चित्रटात घेण्याविषयी विचार सुरू होता.

अधिक वाचा- 

अश्लील व्हिडिओ प्रकरणी गहना अटकेत होती. नंतर ती जामीनावर बाहेर आली.

शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा
शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा

राज कुंद्रा बॉलीफेम नावाचा एक अॲप करणार होता लॉन्च

तिने एका मुलाखतीत सांगितले की, 'माझ्या अटकेच्या काही दिवस आधी ती राजच्या ऑफिस गेली होती.

तिथे तिला समजलं की, बॉलीफेम नावाचा एक ॲप लॉन्च करण्याची तयारी राज करत आहे.'

तो रिॲलिटी शो, चॅट शो, म्युझिक व्हिडिओ आणि नॉन बोल्ड चित्रपटांसाठी ॲपची तयारी करत होता.

आम्ही एका स्क्रिप्टवर चर्चा केली. तो शमिता शेट्टीला यामध्ये कास्ट करण्याच्या तयारीत होता.' पोलिसांनी सोमवार, १९ जुलै रोजी २ तासांच्या चौकशीनंतर राज कुंद्राला अटक केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, राज कुंद्राचे काही व्हॉट्सॲप ग्रुपचे चॅटदेखील समोर आले होते.

राज कुंद्रा H अकाऊंट नावाच्या एका ग्रुपचे ॲडमिन होते. या ग्रुपमध्ये ते पेमेंट्स आणि रेव्हेन्यू विषयी बोलत होता.

अधिक वाचा –

पाहा व्हिडिओ – कोल्हापूर शहर महापुराच्या विळख्यात : Flooded Kolhapur City, Drone Video

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news