Jet Airways : संजीव कपूर यांची जेट एअरवेजच्या सीईओपदी नियुक्ती | पुढारी

Jet Airways : संजीव कपूर यांची जेट एअरवेजच्या सीईओपदी नियुक्ती

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॅलरॉक-जालान कन्सोर्टियमने (Kalrock-Jalan consortium) जेट एअरवेजचे (Jet Airways) नवे सीईओ म्हणून संजीव कपूर (Sanjiv Kapoor) यांची नियुक्ती केली आहे. ते ४ एप्रिल पासून जेट एअरवेज कार्यभार हाती घेणार आहे. संजीव कपूर सध्या ओबेरॉय हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सचे अध्यक्ष आहेत.

याआधी ते २०१६ ते २०१९ पर्यंत विस्तारा येथे चीफ स्टॅटेजी अँड कमर्शियल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात, एअरलाइनने दिवसाला ९ वरुन ४० विमाने आणि ४० वरून २०० पेक्षा जास्त उड्डाणे घेत प्रगती केली होती, असे कन्सोर्टियमने एका निवेदनात म्हटले आहे.

महसूल निर्मिती, ग्राहकांशी संबंधित धोरण, नेटवर्क नियोजन, मार्केटिंग आणि उत्पादन विकास यासह विस्ताराच्या सर्व कार्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे सांभाळली. विस्तारामध्ये रुजू होण्यापूर्वी, कपूर यांनी २०१४-१५ मध्ये स्पाइसजेटचे सीओओ तसेच नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१५ दरम्यान सीईओ म्हणून काम पाहिले होते.

मी जेट एअरवेजला (Jet Airways) पुन्हा एकदा ग्राहकांच्या पसंतीची एअरलाइन बनविण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया कपूर यांनी दिली आहे.

पहा व्हिडिओ : मिशन गंगा | Pudhari Podcast

Back to top button