सुनेला आणायला गेलेल्या सासूच्या गुप्तांगात चटणी टाकली; सूनेचाही तोच आरोप! व्हिडिओ व्हायरल

सुनेला आणायला गेलेल्या सासूच्या गुप्तांगात चटणी टाकली; सूनेचाही तोच आरोप! व्हिडिओ व्हायरल
Published on
Updated on

बाडमेर; पुढारी ऑनलाईन : सासू आणि सुनेमधील भांडण हा भारतामधील अविभाज्य भाग आहे. यामध्ये अनेक क्रुर घटनाही घडून गेल्या आहेत आणि आजही त्या सर्रास होत आहेत. आता अशीच एक घटना राजस्थानमधील बाडमेर जिल्ह्यात घडली आहे.

बाडमेर जिल्ह्यात सिंदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कामठई येथील एक महिला भांडून माहेरी गेलेल्या सुनेला आणण्यासाठी गेली होती. सासू सूनेच्या माहेरी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी जोरदार राडा झाला. हा राडा इतका भयंकर झाला, की सासूला धरून प्रायव्हेट तिच्या गुप्तांगात चटणी टाकण्यात आली.

या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे (Barmer viral video). याप्रकरणी पोलिसांनी दोन महिलांनाही ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी पीडिताची वैद्यकीय चाचणी केली आहे. सुनेनं सुद्धा गुप्तांगात चटणी फेकल्याचा आरोप केला आहे. दोघींनी पकडून गुप्तांगात चटणी टाकल्याचे तिने म्हटले आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडित महिला (सासू) आपल्या मुलाच्या पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरच्या सिंधरी कामथाई येथे गेली होती. यादरम्यान मुलाच्या सासरच्या काही महिलांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर सासरच्या दोन महिलांनी पीडिताला मारहाण केली. त्यानंतर गुप्तांगात चटणी टाकण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. हा व्हिडिओ पोलिसांपर्यंत पोहोचला. याप्रकरणी आता पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. हा व्हिडिओ आठवडाभर जुना असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन महिला पीडिताला पकडून ठेवताना दिसत आहेत. पीडितेने आरोप केला आहे की, दोन महिलांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जबरदस्तीने मिरचीसारखे काहीतरी टाकले. महिलेने स्वत:ला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र दोन महिलांनी पीडितेला पकडून गैरवर्तन केले.

दोन महिलांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या महिलांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी पीडित महिलेचे मेडिकलही करून घेतले आहे. पोलीस व्हिडिओच्या निर्मात्याचा शोध घेत आहेत.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news