Russia vs Ukraine War : भूमिका बदलून जर्मनीकडून युक्रेनसाठी १५०० शस्त्रात्रे व क्षेपणास्त्रे | पुढारी

Russia vs Ukraine War : भूमिका बदलून जर्मनीकडून युक्रेनसाठी १५०० शस्त्रात्रे व क्षेपणास्त्रे

बर्लिन, पुढारी ऑनलाईन : तीन दिवसांपासून रशियाशी कट्टरपणे दोन हात करणाऱ्या युक्रेनच्याच्या मदतीसाठी इतर देशांनी केवळ रशियाचा निषेध करत आर्थिक निर्बंध जाहीर केले. पण, याचा रशियाला काहीच फरक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे खरं तर रशियासोबतच्या युद्धात युक्रेन एकाकी पडला होता. मात्र, ऐनवेळी जर्मनी युक्रेनच्या मदतीला धावून आला आहे. जर्मनीनं युक्रेनसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. (Russia vs Ukraine War)

मूळात वादग्रस्त भागातील देशांना शस्त्रांची निर्यात करायची नाही, अशी जर्मनीची भूमिका होती. मात्र, ही भूमिका जर्मनीने युक्रेनसाठी बदलली आहे. जर्मनी युक्रेनला रशियाच्या विरोधात वापरण्यासाठी १००० रणगाडाविरोधी शस्त्रास्त्रं आणि ५०० स्टिंगर क्षेपणास्त्र देणार आहे. स्टिंगर क्षेपणास्त्र असं क्षेपणास्त्रं आहे, त्याच्याने जमिनीवर राहून हवेत हल्ला करता येतो.

खरंतर एक महिन्यापासून अमेरिकेनं रशियाला आव्हान दिलं होतं. पण, ऐनवेळी युक्रेनच्या मदतीला अमेरिका धावून गेली नाही. त्यामुळे अमेरिकेची नाचक्की झाली होती. त्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीननं सज्जड दम दिला होता की, “आमच्या युद्धात कुणी हस्तक्षेप केला तर त्याची खैर नाही. जगाचा इतिहास बदलून ठेवेन.” त्याच्यामुळे अमेरिकेने आणि नाटोने दोघांनीही युक्रेनबद्दलची आपली भूमिका बदलली. (Russia vs Ukraine War)

अशा पार्श्वभूमीवर आपली काहीतरी युक्रेनला मदत असावी, या भूमिकेतून अमेरिकेने युक्रेनच्या पंतप्रधनांना देश सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी थेट सांगितले की, “तुम्ही आम्हाला मदतच करणार असाल तर, शस्त्रांची करा.” यावर अमेरिकेने युक्रेनला मोठी मदत करण्याचे धाडस केले. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा दिशेने पाठवला आहे. पण, ही मदत पाहता दारुगोळ्यांची गरज आहे. त्यात अमेरिकेने युक्रेनला शस्त्रं खरेदी करण्यासाठी ३५० दशलक्ष डाॅलर्सची मदत केली आहे.

व्हिडिओ पहा : महायुद्धाचे ढग

हे वाचलंत का? 

Back to top button